Home /News /entertainment /

'आता आपण कधीही एकटे नसू....' बाळू मामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'आता आपण कधीही एकटे नसू....' बाळू मामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

नुकताच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. आता यानंतर मराठी टीव्ही विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीनं देखील साखरपुडा केल्याचे समोर आले आहे.

  मुंबई, 5 एप्रिल- मराठी मनोरंन विश्वात सध्या लग्न, साखरपुडा याचं वारं जोरा वाहात आहे. नुकताच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. आता यानंतर मराठी टीव्ही विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीनं देखील साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. सध्या तिच्या या साखऱपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं (balumamachya navana changbhala ) या मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिक आहे. या मालिकेत सखूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच थाटा साखरपुडा पार पडाला. मालिकेत सखूची भूमिका अमृता उत्तरवार ( amruta uttarwar ) हिने साखारली आहे. वाचा-अभिज्ञाच्या आयुष्यात 'आहो'ची जागा घेतली या व्यक्तीनं, फोटो पोस्ट करत म्हणाली.... अमृताने विशाल बोनगिरवारसोबत थाटात साखरपुडा केला आहे. ‘या दिवसापासून पुढे आपण कधीही एकटे नसू.’ असे कॅप्शन देऊन तिने साखरपुड्याचा खास फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांसह सेलेब्सकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  अमृता मूळची पुसदची आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून तीला अभिनयाची ओढ लागली. अमरावती युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर अमृताने काही काळ नोकरी देखील केली. पण नोकरीत फारसे मन रमेना म्हणून मग हौशी नाटक, प्रायोगिक नाटक साकारत असतानाच तिची पाऊले मुंबईच्या दिशेने वळवली. युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले या नाटकातून तिला मुख्य भूमिका मिळाली. मनोधैर्य या चित्रपटात तिने किशोरी शहाणे सोबत मुख्य नायिकेची भूमिका देखील साकारली. साऊ माझी सौभाग्याची, त्या चार योनींची गोष्ट, आयुष्य, घेतला वसा टाकू नको, नकळत सारे घडले, श्री गुरुदेव दत्त, who is she अशा चित्रपट, नाटक, शॉर्टफिल्म आणि मालिकांमधून अमृताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या