मुंबई, 09 जानेवारी : काही वर्षांपूर्वी बालिका वधू (Balika Vadhu)या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अविका गोरने (Avika Gor)आपल्या गोंडस रुपाने आणि अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. आता अविकाने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अतिशय स्लीम ट्रीम आणि आकर्षक दिसणाऱ्या अविकाचे बोल्ड अंदाजातील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, अविकाचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अविकानं निळ्या रंगाच्या बिकिनीमधला (Blue Bikini) स्विमिंगपूलच्या काठावर सनबाथ घेतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.अविकानं आपलं वजन कमी केल्याचं आणि आपला लूक बदलल्याचं या फोटोवरून दिसत आहे. तिचा हा फोटो बघून चाहत्यांनी तिचे कौतुक केले असून, ब्युटीफुल, पॉवर टू यु गर्ल, डॅशिंग लूक अशा कमेंटस केल्या आहेत.
अविकाने वजन कमी करण्यावर आणि आपला संपूर्ण लूक बदलण्यावर खूप मेहनत घेतली असून, आपल्या नव्या आकर्षक रूपातील वेगवेगळे फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिने 13 किलो वजन कमी केलं असून, आपला लूकही स्टायलिश ठेवण्यावर भर दिला आहे.
View this post on Instagram
तिचा पिवळ्या आणि गुलाबी साडीतील फोटोसह अन्य काही आकर्षक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. त्यांनाही चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अविकाने आपण वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी ट्रान्सफोर्मेशन करण्यासाठी का आणि कसे वळलो याबाबत एक भलीमोठी पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली होती.
तिचं वजन खूप वाढलं आहे, याची जाणीव तिला स्वतःला एकदा आरशात पाहताना झाली. काही आजारामुळे वजन वाढलं असतं तर ठिक होतं. पण हे मी स्वतःच्या कर्माने वाढवलं होतं. कधीही काहीही खाणं आणि व्यायाम न करणं यामुळं मी जाड झाले होते. आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते, पण मी तसं केलं नाही, असं तिनं यात लिहिलं होतं. छोट्या पडद्यावर लहानपणापासून काम करत असल्यानं तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. तिच्या आहे त्या रुपात चाहते तिच्यावर प्रेम करत होते. त्यामुळे आपल्याला स्वतःला बदलावं वाटलं नाही,असंही तिने सांगितलं. मी व्यावसायिक दृष्ट्या काम करत होते पण आनंदी नव्हते, त्यामुळे फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही मी माझं शंभर टक्के काम देऊ शकत नाही, असं वाटत असल्याचं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
आपल्या वाढदिवसादिवशी, 30 जून रोजी तिने आपण शंभर टक्के काम द्यायचं असा निश्चय केला आणि त्यादृष्टीने स्वतःला बदलण्यावर लक्ष केंद्रित केलं. योग्य आहार, व्यायाम यावर भर दिला, आणि माझं ध्येय साध्य केलं, आता मी खूप आनंदी आहे, असंही अविकाने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
View this post on Instagram
अविकाने ससुराल सिमर का मालिकेतही काम केलं असून, पाठशाला, मॉर्निंग वॉक अशा काही चित्रपटामधूनही काम केलं आहे. अविका रोडीज रिअल हिरोजमधील स्पर्धक आणि कॅम्प डायरीज या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक मिलींद चंदवाणी याला डेट करत असून, त्या दोघांचेही अनेक फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: मनोरंजन