Home /News /entertainment /

अभिनेत्री नव्हे तर व्हायचं होतं पत्रकार! वाचा सुरेखा सिक्रींचा अनोखा किस्सा

अभिनेत्री नव्हे तर व्हायचं होतं पत्रकार! वाचा सुरेखा सिक्रींचा अनोखा किस्सा

‘बालिका वधू’ (Balika Vadhu) फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri Death) यांचं नुकताच दुखद निधन झालं आहे.

    मुंबई,16 जुलै- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri Death) यांचं नुकताच दुखद निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाची छाप चाहत्यांवर पाडली आहे. पण सुरेखा यांना सुरुवातीपासूनचं अभिनेत्री नव्हे तर एक पत्रकार व्हायचं होतं. मात्र त्या झाल्या एक प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घेऊया काय आहे, हा किस्सा... सुरेखा सिक्री या एक थियेटर अभिनेत्रीही होत्या. तसेच त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ठळक भूमिका साकारल्या आहेत. त्यांना तब्बल 3 वेळा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये तमस(1988), मम्मो(1995) आणि बधाई हो(2018) या चित्रपटांचा समावेश आहे. 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना चित्रपट ‘बधाई हो’ मधील आज्जीच्या उत्तम भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. (हे वाचा:बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री याचं दुखद निधन ) मात्र सुरेखा सिक्री यांचं अगदी लहाणापासून स्वप्न होतं की त्यांनी एक पत्रकार बनावं. किंवा एखादी लेखिका बनावं. मात्र त्यांच्या नशिबाने त्याना एक प्रसिद्ध अभिनेत्री बनवलं. सुरेखा सिक्री या  अलीगड मुस्लीम विद्यापीठात शिक्षण घेत होत्या. याच दरम्यान अब्राहम अल्काजी यांनी तेथे एक रंगमंचावरचं नाटक आणलं होतं. ‘द किंग लियर’ हे ते नाटक होतं. या नाटकाचा अद्भुत परिणाम सुरेखा यांच्या मनावर झाला होता. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री बनण्याचा पहिल्यांदा विचार केला. आणि यासाठी त्यांनी ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ मध्ये प्रवेश घेतला होता. अशा पद्धतीने एक पत्रकार बनू इच्छिणारी तरुणी एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Actress, Entertainment

    पुढील बातम्या