प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; मात्र अद्यापही व्हेंटिलेटरवर

प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; मात्र अद्यापही व्हेंटिलेटरवर

गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubramaniam) गेल्या एक महिन्यांहून अधिक वेळापासून रुग्णालयात भर्ती आहेत

  • Share this:

मुंबईः बॉलिवूडसह तमिल, तेलुगू आणि अन्य भाषांमधील सदाबहार गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubramaniam) गेल्या एक महिन्यांहून अधिक वेळापासून रुग्णालयात भर्ती आहेत. त्यांचे फॅन्स बालासुब्रमण्यम यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत आहेत. एसपी बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam health Update) गेल्या काही दिवसांपासून चेन्नईतील 'एमजीएम हेल्थकेयर' रुग्णालयात उपचार घेत आहे.

त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. आता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला (S P Balasubrahmanyam Corona Report) आहे. मात्र अद्यापही त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे.

बालासुब्रमण्यम यांचा मुलगा एसपी चरण यांनी आपल्या वडिलांची हेल्थ अपडेट जारी केली आहे. ज्यात त्यांनी बालासुब्रमण्यम यांच्या सद्याच्या प्रकृतीची माहिती दिली. बालासुब्रमण्यम यांच्या मुलाने सांगितले की त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा बरी आहे. त्यांनी जेवण सुरू केलं आहे. आणि  फीजीयोथेरेपीदेखील करीत आहेत. एसपी चरण यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती दिली.

View this post on Instagram

A post shared by S. P. Charan/Producer/Director (@spbcharan) on

हे ही वाचा-आता कंगनाचा राहुल गांधींसोबत पंगा; म्हणते, मुंबई POK नाही तर सीरियाप्रमाणे...

एसपी चरण यामध्ये म्हणतात की, अप्पा यांची प्रकृती स्थिर आहे. अद्यापही ते वेंटिलेटरवर आहेत. त्यांचे सर्व रिपोर्ट सामान्य आहेत. आमची आशा आहे की लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. त्यांना संसर्गदेखील नाही. त्यांच्या फुप्फुसांबरोबर श्वसनाची समस्याही बऱ्याच अंशी कमी झाली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 20, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या