Bala Official Trailer : आयुष्मानचा आणखी एक धमाका, पोट धरुन हसवणारी कॉमेडी

Bala Official Trailer : आयुष्मानचा आणखी एक धमाका, पोट धरुन हसवणारी कॉमेडी

आयुष्मानचा आगामी सिनेमा 'बाला'चा ऑफिशिअल ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुरानानं पुन्हा एकदा जबरदस्त धमाका केला आहे. आयुष्मानचा आगामी सिनेमा 'बाला'चा ऑफिशिअल ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला प्रक्षेकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही मिनिटातच या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या सिनेमात आयुष्मान केस गळतीच्या समस्येशी झगडताना दिसणार आहे. पण या गंभीर समस्येमध्ये ज्याप्रकारे कॉमेडीचा वापर करण्यात आला आहे तो अंदाज सर्व प्रेक्षकांना आवडला आहे.

या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना केसांच्या समस्येशी आणि टक्कल पडण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे उपाय करताना दिसत आहे. पण एवढे उपाय करुनही त्याला या समस्येला समाधानकारक उपाय सापडत नाही. फक्त घरगुती उपायच नाही तर तो हेअर ट्रान्सप्लान्टचीही तयारी करतो मात्र शेवटी पदरी निराशाच पडते.

शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था

या सिनेमात आयुष्यमान खुराना प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय या सिनेमात भूमि पेडणेकर, यामी गौतम, सीमा भार्गव, अभिनेता सौरभ शुक्ला आणि मनोज पहवा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमातील दमदार संवाद ही या सिनेमाची सर्वात महत्त्वाची बाजू आहे. या सिनेमातील संवाद तुम्हाला हसवतात सुद्धा आणि बालाच्या समस्येची गंभीरताही दाखवतात.

दीपज्योतीनं 50 लाखांच्या प्रश्नावर सोडला KBC, 'मन की बात' ऐकून जिंकले 25 लाख

अमर कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर कौशिक यांनी याआधी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'बाला'च्या ट्रेलरचं जसं कौतुक केलं जातं आहे. त्यावरुन तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असं चित्र आहे. सुपर कॉमेडी ट्रेलरमुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.

वयाच्या 65व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य कायम, काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट

===========================================================

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 02:24 PM IST

ताज्या बातम्या