FILMFARE नामांकनाबद्दल यामीने अखेर सोडलं मौन, शेअर केलं खुलं पत्र

FILMFARE नामांकनाबद्दल यामीने अखेर सोडलं मौन, शेअर केलं खुलं पत्र

‘बाला’ फेम अभिनेत्री यामी गौतमला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘बाला’ सिनेमासाठी नामांकन न मिळाल्याने तिचे फॅन्स नाराज झाले आहेत. याबाबत यामीने अखेर मौन सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : ‘बाला’ फेम अभिनेत्री यामी गौतमला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘बाला’ सिनेमासाठी नामांकन न मिळाल्याने तिचे फॅन्स नाराज झाले आहेत. याबाबत यामीने अखेर मौन सोडलं आहे. यामीने सोशल मीडियावर खुलं पत्र लिहीत आपल्या फॅन्सची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘असं काही, जे मी शेअर करू इच्छिते’ असं कॅप्शन देत हे पत्र यामीने पोस्ट केलं आहे. यामी गौतमने आपल्या फिल्म करिअरमध्ये ‘विकी डोनर’, ‘उरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

यामीने पोस्ट केलेल्या पत्राला विक्रांत मेसी, आयुष्मान खुराना, काजल अग्रवाल, वरुण धवन, दिया मिर्झा, ताहिरा कश्यप आणि आदित्य धर यांनी  लाईक केलं आहे. यामीचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स देखील या सर्वांनी केल्या आहेत. यामीच्या फॅन्सनी देखील तिच्या या पोस्टचं आणि फिल्मफेअर सोहळ्यामध्ये नामांकन न झाल्यानंतर तिने मांडलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.

(हेही वाचा-रणबीरच्या आईचा TikTok डेब्यू, 'COOL आजी'चा नातीबरोबरचा VIDEO VIRAL)

यामीने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ‘फिल्मफेअर 2020 दरम्यान ‘बाला’ सिनेमातील माझं काम दूर्लक्षित झाल्यासंदर्भातील अनेक मेसेजेज मला मिळाले. त्यामुळे मी हे पत्र लिहीत आहे.  खरं सांगायचं तर पुरस्कार मिळाल्यानंतर आत्मविश्वास आणखी वाढतो. त्यापेक्षाही जर एखाद्या पुरस्कारासाठी नामांकन मिळणं तुमची क्षमता आणि मेहनतीप्रति प्रेमाचं स्वरूप असतं. ज्युरी मेंबर्सनी सिनेसृष्टीमध्ये मोठं योगदान दिलं आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करते’

 

View this post on Instagram

 

Something I wish to share :)

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

यामी पुढे म्हणाली की, ‘केवळ अनुभवामुळेच आत्मविश्वास आणखी मजबूत होतो. एवढ्या वर्षात मला इंडस्ट्री, क्रिटिक्स, मीडिया, प्रतिभावान सहकलाकार आणि मुख्यत: प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आणि विश्वास मिळाला आहे, तो माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्ही कुठून आले आहात, कोण आहात या गोष्टींमुळे फरक पडत नाही. फक्त हार न पत्करता पुढे जाणं जरूरी आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2020 09:05 PM IST

ताज्या बातम्या