मुंबई 27 जून : ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) या चित्रपटातून लोकप्रिय झालेली बालकलाकार अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra) नेहमी चर्चेत असते. चित्रपटातील तिच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांना अश्रू पुसायला भाग पाडलं होतं. अभिनेता सलमान खाननेही (Salman Khan) त्याच्या चित्रपटातील मुन्नीचं फार कौतुक केलं होतं.
हर्षाली आता मोठी होत असून ती फारच गोड दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा 13 वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सोशल मीडिया वर ती फार सक्रिय असते. दरम्यान हर्षालीची आई तिचं अकाउंट हॅण्डल करते.
'पवित्र रिश्ता'ची सोज्वळ पूर्वी झाली फारच बोल्ड; नवा अंदाज पाहून व्हाल थक्क
सोशल मीडिया वर अनेकदा हर्षाली काही मजेशीर व्हिडिओज, रिल्स शेअर करते. त्यावर तिच्या चाहत्यांकडून तिला चांगला प्रतिसादही मिळतो. आताही हर्षालीने असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. पण त्यावर तिला ट्रोल करण्यात आलं.
या मजेशीर रिल्स मध्ये हर्षाली म्हणतेय, 'एक ही शर्त पर हां करूंगी, गुस्सा भी मैं करूंगी, रूठूंगी भी मैं, बात भी मैं नहीं करूंगी, मुंह भी मैं सुजाऊंगी, पर मनाओगे आप।' त्यावर तिला काही युजर्सनी तिला ट्रोल केलं. काहींनी म्हटलं तुझ वय काय करतेस काय तर काही म्हणाले अभ्यासावर लक्ष दे.
View this post on Instagram
एका युजरने लिहिलं होत, ‘अच्छा.. तुझ वय काय? अभ्यासावर लक्ष दे.. एवढ्या लवकर बॉयफ्रेंडच्या भानगडीत नको पडू. तू अजून लहान आहेस.’ यावर हर्षालीनेही रिप्लाय देत म्हटलं आहे की, ‘तुम्ही तर याला फारच गांभीर्याने घेतल.. हे फक्त मनोरंजनासाठी होतं.’
हर्षाली अवघी 7 वर्षांची असताना बजरंगी भाईजान चित्रपटात झळकली होती. तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं. त्याआधीही ती ‘कबूल है’ या मालिकेत दिसली होती. लवकरच ती एका चित्रपटातही दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Salman khan