मुंबई, 19 मार्च- 'बाहुबली'च्या (Bhaubali) यशानंतर प्रभास (Prabhas) देशातच नव्हे जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचा जगभरात जबरदस्त चाहतावर्ग आहे. या यशानंतर प्रभास सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. तो एका चित्रपटासाठी 150 कोटी इतकं मानधन घेतो. परंतु अभिनेत्याबद्दल एक चिंतेची बाब समोर आली आहे, अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासचा त्याच्या आगामी 'सालार' या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. त्यामुळे अभिनेत्यावर बार्सिलोना, स्पेनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
प्रभासवर ही छोटीशी शस्त्रक्रिया झाली असली तरी पुढील टेस्ट होईपर्यंत डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. नुकतंच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी त्याला काही दिवस बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. जगप्रसिद्ध अभिनेत्याच्या शस्त्रक्रियेची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आणि सोशल मीडियावर त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. लाखो लोक त्यांच्या आवडत्या सुपरस्टारला लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
प्रभासचा 'सालार' 14 एप्रिल 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून त्यात तो श्रुती हसनसोबत झळकणार आहे. हा चित्रपट तब्बल 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जात आहे, जो प्रशांत नील दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट तेलुगु-कन्नडमध्ये रिलीज होणार आहे. होंबळे फिल्म्स प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. यात अभिनेते जगपती बाबूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
11 मार्च रोजी त्याचा 'राधे श्याम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये पूजा हेगडेसोबत त्याची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. 350 कोटी रुपये खर्चून बनलेला राधे श्याम तितकासा कमाल करू शकला नाही.कारण ज्या किमतीत हा चित्रपट बनवला आहे. तो आठ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर रक्कम वसूल करू शकलेला नाहीय. या चित्रपटाने आतापर्यंत 191 कोटींचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Prabhas, South indian actor