'बाहुबली'तल्या कटप्पाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँमध्ये

'बाहुबली'तल्या कटप्पाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँमध्ये

लंडनच्या मादाम तुसाँमध्ये लवकरच 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच अभिनेता सत्यराज यांचा पुतळा उभारण्यात येणारेय. सत्यराज यांचा मुलगा सिबिराजने ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.

  • Share this:

14 मार्च : लंडनच्या मादाम तुसाँमध्ये लवकरच 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच अभिनेता सत्यराज यांचा पुतळा उभारण्यात येणारेय. सत्यराज यांचा मुलगा सिबिराजने ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.सध्या सोशल मीडियावर सत्यराज यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

'बाहुबली: द बिगनिंग' या सिनेमातल्या देशभरातील जनतेला एका प्रश्नात गुंतवून गेला. 'कटप्पाने बाहुबलीला का मारले,' या प्रश्नाने अनेकांनाच भंडावून सोडले होते. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही बॉक्स ऑफीसवर प्रचंड कमाई केली. त्यातूनच 'कटप्पा'ची भूमिका लोकप्रिय झाली. कटप्पा अजरामर व्यक्तिरेखा बनली. आणि त्याची दखल लंडननेही घेतली. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासचाही पुतळा मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला होता.

First Published: Mar 14, 2018 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading