Home /News /entertainment /

प्रभासने 'आदिपुरुष' को-स्टार सैफ अली खानला पाठवली बिर्याणी; करिनाने म्हटलं 'बाहुबलीने पाठवली तर .....'

प्रभासने 'आदिपुरुष' को-स्टार सैफ अली खानला पाठवली बिर्याणी; करिनाने म्हटलं 'बाहुबलीने पाठवली तर .....'

करिना कपूरचा पती म्हणजेच अभिनेता सैफ अली खान साऊथ स्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' या चित्रपटात एकत्र झळकणार आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर- बॉलिवूडची (Bollywood) बेबो करिना कपूर(Kareena Kapoor) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. शनिवारी रात्री करिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डिनरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये बिर्याणी आणि अन्य स्वादिष्ट पदार्थ दिसून येत आहेत. करिनाने फोटो शेअर करत म्हटलं आहे, ही बिर्याणी(Sent Biryani) बाहुबली स्टार प्रभासने(Prabhas) पाठवली आहे. अभिनेत्री करिना कपूर सोशल मीडियावरून आपल्या रोजच्या अपडेट चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. ती सतत काही ना काही पोस्ट करत असते. चाहतेही तिच्या पोस्टची उत्सुकतेने वाट पाहात असतात. नुकताच अभिनेत्री करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये करिनाने स्वादिष्ट पदार्थांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये बिर्याणी आणि अन्य काही पदार्थ दिसून येत आहेत. करिनाला हा डिनर खूपच आवडला. आणि त्याचं कारणही तितकंच खास आहे. करिनाने ही पोस्ट करत सांगितलं की हा स्वादिष्ट डिनर ही बिर्याणी त्यांनां साऊथ सुपरस्टार बाहुबली फेम अभिनेता प्रभासने पाठवली होती. करिनाने स्टोरी शेअर करत म्हटलं आहे, 'जेव्हा बाहुबली तुम्हाला बिर्याणी पाठवतात तेव्हा ती सर्वोत्कृष्टचं असणार. या स्वादिष्ट भोजनासाठी धन्यवाद'. असं म्हणत करिनाने प्रभासचे आभार मानले आहेत. (हे वाचा:मुलांसारखे केस, शाळेचा गणवेश'; ओळखलं का या बॉलिवूड अभिनेत्रीला? ) करिना कपूरचा पती म्हणजेच अभिनेता सैफ अली खान साऊथ स्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट रामायणचं रूपांतरित कथा असणार आहे. या चित्रपटात प्रभास रामपासून प्रेरित भूमिकेत दिसणार आहेत. तर क्रिती सेनन सीता मातेपासून प्रेरित भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत तर अभिनेता सैफ अली खान रावणावर आधारित लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट असल्याने चाहते फारच उत्सुक झाले आहेत. (हे वाचा:Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज; चाहत्यांना झाली...) याआधी अभिनेता प्रभासने सैफ अली खानसोबत काम करण्यावर आनंद व्यक्त केला होता. इतकंच नव्हे तर प्रभासने आपल्याला अभिमान वाटत आहे इतक्या मोठ्या कलाकारासोबत पडद्यावर एकत्र यायची संधी मिळाली असं म्हणत सैफचं कौतुक केलं होत. या चित्रपटामुले या दोन्ही कलाकारांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले आहेत. याच पार्श्ववभूमीवर प्रभासने सैफ आणि करिनासाठी बिर्याणी पाठवली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Kareena Kapoor, Prabhas

    पुढील बातम्या