मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /खरा बाहुबली आहे तरी कसा? करण जोहरनं उलगडली गुपितं

खरा बाहुबली आहे तरी कसा? करण जोहरनं उलगडली गुपितं

नुकतेच करण जोहरच्या काॅफी विथ करण या शोमध्ये बाहुबलीचे कलाकार प्रभास, राणा दागुबाती आणि दिग्दर्शक एस राजामौली आले होते. त्यावेळी बाहुबलीचं खऱ्या आयुष्यातलं वेगळंच रूप समोर आलं.

  मुंबई, 24 डिसेंबर : नुकतेच करण जोहरच्या काॅफी विथ करण या शोमध्ये बाहुबलीचे कलाकार प्रभास, राणा दागुबाती आणि दिग्दर्शक एस राजामौली आले होते. त्यावेळी बाहुबलीचं खऱ्या आयुष्यातलं वेगळंच रूप समोर आलं.

  बाहुबलीचे दिग्दर्शक एस राजामौली म्हणाले, प्रभास खूप आळशी आहे. त्याची अॅक्शन ही अॅक्शन म्हटल्यावरच होते. प्रभासनं हे मान्य केलं. तो म्हणाला, मला जास्त वेळ आराम करायलाच आवडतं. लोकांशी फार बोलायलाही आवडत नाही. खऱ्या आयुष्यात प्रभास लाजाळू आहे. अनोळखी लोकांशी तो संवाद साधू शकत नाही.

  भल्लादेवची भूमिका साकारणाऱ्या दागुबातीनं सांगितलं, प्रभास जास्त वेळा गप्पच असतो. तो गर्दीपासून दूर राहतो. एरवी अगदी सैतान असलेला प्रभास अनोळखी लोकांसमोर शांत होऊन जातो.

  प्रभासनं अजून एक आपले गुण सांगितले. तो म्हणाला एखादा सिन शूट झाला, दिग्दर्शक कट म्हणाला की पुन्हा तो त्या मूडमध्ये येऊ शकत नाही. प्रभास खाण्याचा शौकिन आहे. एकदा त्यानं आपल्या वहिनीला रात्री 2वाजता जेवण करायला सांगितलं होतं.

  प्रभासला त्याच्या अफेरबद्दलही करणनं विचारलं. अनुष्का शेट्टीसोबत अफेअर असल्याचं प्रभासनं नाकारलं.

  ‘कॉफी विथ करण सीझन-6‘ ला  21 आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने गेल्या 14 वर्षांपासून कार्यक्रमाचे पाच सीझन केले आहेत.बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना बोलवून त्यांची मुलाखत घेण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात येतो.

  कॉफी विथ करणचा सीझन-6 हा गर्ल्स पॉवर या विषयावर आधारित आहे. म्हणूनच तरुणांच्या पसंतीच्या आणि अल्पावधीत इंडस्ट्रीमध्ये यश मिळवणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण या दोघींपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

  Birthday special : मोहम्मद रफींच्या आयुष्यातल्या 10 महत्त्वाच्या घटना

  First published:

  Tags: Bahubali, Cofee with karan, Karan Johar, Prabhas