Home /News /entertainment /

Prabhas Fees: 'राधे श्याम' फ्लॉप होऊनसुद्धा प्रभासचा भाव वाढला;एका सिनेमासाठी घेणार तब्बल इतकी रक्कम

Prabhas Fees: 'राधे श्याम' फ्लॉप होऊनसुद्धा प्रभासचा भाव वाढला;एका सिनेमासाठी घेणार तब्बल इतकी रक्कम

सध्या सर्वत्र साऊथ कलाकारांची (South Actors) चलती आहे. या कलाकारांना जगभरातून प्रेम आणि प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान 'बाहुबली' (Bahubali) या चित्रपटातून साऊथ स्टार प्रभास (Actor Prabhas) जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच प्रभास हा देशातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक समजला जातो. प्रभास आता आपल्या मानधनाच्या बाबतीत केवळ साऊथच नव्हे तर बॉलिवूड स्टार्सनासुद्धा मागे टाकत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जून-   सध्या सर्वत्र साऊथ कलाकारांची  (South Actors)  चलती आहे. या कलाकारांना जगभरातून प्रेम आणि प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान 'बाहुबली' (Bahubali) या चित्रपटातून साऊथ स्टार प्रभास   (Actor Prabhas)  जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच प्रभास हा देशातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक समजला जातो. प्रभास आता आपल्या मानधनाच्या बाबतीत केवळ साऊथच नव्हे तर बॉलिवूड स्टार्सनासुद्धा मागे टाकत आहे.आता पुन्हा एकदा प्रभासने आपल्या मानधनात वाढ केल्याचं म्हटलं जात आहे. राजामौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटाने त्याला एक ग्लोबल स्टार बनवलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याची लोकप्रियता तर वाढलीच पण त्याच्या मानधनातसुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. 'बाहुबली' फ्रँचायझीमध्ये काम केल्यानंतर जगभरातील लोक त्याचे चाहते बनले आहेत.या चित्रपटांनंतर अभिनेत्याने आपलं मानधन वाढवलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा प्रभासनेत्याच्या मानधनात भरघोस वाढ केल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने त्याच्या सध्याच्या मानधनामध्ये जवळपास 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासने त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांकडे 20 कोटी रुपये अतिरिक्त मागितले आहेत. या चित्रपटासाठी तो आधीच 100 कोटी रुपये घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता त्याने निर्मात्यांना यापेक्षा अधिक म्हणजेच 120 ते 125 कोटी रुपये देण्यास सांगितलं आहे. मात्र अभिनेत्याने याबाबत कोणतीही अधिकृत नाहीय. (वाचा:Rashmika Mandanna News: रश्मिका मंदनाने आपल्या डॉगीसाठी मागितलं विमानाचं तिकीट? झाला खुलासा ) प्रभास हा आपल्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटात तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 500 कोटी रुपये खर्चून बनवला जात असून यामध्ये तिच्यासोबत क्रिती सेनन असून ती सीतेची भूमिका साकारणार आहे. तर या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानसुद्धा असणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South indian actor

    पुढील बातम्या