मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD Tamannaah: बॉलिवूडमध्ये अपयशानंतर साऊथकडे वळवला मोर्चा; अन् झाली सुपरस्टार

HBD Tamannaah: बॉलिवूडमध्ये अपयशानंतर साऊथकडे वळवला मोर्चा; अन् झाली सुपरस्टार

बाहुबलीतील राजकुमारी तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमर लूकमुळे फक्त साऊथमध्येच नाही तर पूर्ण देशात तिचे फॅन्स आहेत.

मुंबई, 21 डिसेंबर: साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठं यश संपादन करणाऱ्या तमन्ना भाटियाचा (Tamanna Bhatia) आज वाढदिवस आहे. वयाच्या 15 वर्षी तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी सिनेमातून तिने अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. तमन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला. त्यानंतर तिने आपला मोर्चा तामिळ आणि तेलुगू सिनेमांकडे वळवला. तमन्ना आज साऊथची मोठी स्टार म्हणून ओळखली जाते.

बाहुबली (Bahubali) या चित्रपटामुळे तमन्ना भाटिया संपूर्ण देशातच नाही तर जगभरात पोहोचली. बाहुबली या सिनेमामुळे तिच्या करिअरचा ग्राफ अधिकच उंचावला. सुरुवातीच्या काळात तमन्नाने मॉडेलिंगही केलं आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाची ती ब्रँड अम्बॅसेडर बनली. साऊथमध्ये काम करत असतानाच तिला 2013 मध्ये साजिद खान यांच्या 'हिम्मतवाला' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर ती 'तूतक तूतक तुतिया' चित्रपटामध्येही झळकली होती. पण हे दोन्ही चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत.

तमन्नाचा वाढदिवस आज असला तरी तिचं प्री बर्थडे सेलिब्रेशन केव्हाच सुरु झालं आहे. शूटिंग सुरू असतानाचा चक्क तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा व्हिडीओ तमन्नाने शेअर केला आहे.

तमन्ना एका नॉर्थ इंडियन कुटुंबातील आहे. मात्र तिचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले आहे. तिच्या नावावर बाहुबली, रीबेल, से रा नरसिंहा रेड्डी, अयान, पैरा, सिरुथई यासारखे अनेक हिट चित्रपट आहेत. तमन्ना भाटिया सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

First published:

Tags: South actress