करण जोहरनं 'बाहुबली'चा प्रीमियर केला रद्द

करण जोहरनं 'बाहुबली'चा प्रीमियर केला रद्द

विनोद खन्ना यांच्या निधनामुळे प्रीमियर रद्द झालं. बाहुबलीचा निर्माता करण जोहरनं विनोद खन्नांना श्रद्धांजली वाहिलीय.

  • Share this:

27 एप्रिल : 'बाहुबली 2-द कन्क्लुझन'च्या रिलीजला काही तास उरले आहेत. आज सिनेमाचा ग्रँड प्रीमियर होणार होता. सगळं बाॅलिवूड या प्रीमियरला लोटणार होतं. पण विनोद खन्ना यांच्या निधनामुळे प्रीमियर रद्द झालं. बाहुबलीचा निर्माता करण जोहरनं विनोद खन्नांना श्रद्धांजली वाहिलीय.

सिनेमाचं बुकिंग पुढच्या काही दिवसांसाठी फुल सुद्धा झालंय. भारतीय सिनेमांच्या इतिहासात कधी झालं नाही असा भव्य दिव्य रिलीज या सिनेमाला मिळणार आहे. तब्बल 6000हून अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज होतोय. या स्क्रीन्स अजून वाढवण्याच्या विचारात निर्माते आहेत. तसंच भारतभर बॉलिवूडच्या 5000 स्क्रीन्स आहेत तर साऊथमध्ये तब्बल 3000 स्क्रीन्स उपलब्ध आहेत.

बाहुबलीला कटप्पाने नक्की का मारलं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता फक्त थोडे तास बाकी आहेत. या सगळ्यातल्या 6000 स्क्रीन्स आधीच बुक केल्या गेल्या आहेत. याहून अधिक स्क्रीन्स मिळाल्या तर सोन्याहून पिवळंच होईल. त्या जरी मिळाल्या नाहीत तरी ठरवलेल्या स्क्रीन्सप्रमाणे पहिल्याच दिवशी सिनेमाची कमाई 60 कोटींच्या वर जाईल. कधीही न झालेली गोष्ट या सिनेमाच्या बाबतीत घडेल असं सध्या दिसत आहे.

 

First published: April 27, 2017, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading