'बाहुबली-2'ची पहिल्या आठवड्यात 792 कोटींची कमाई

'बाहुबली-2'ची पहिल्या आठवड्यात 792 कोटींची कमाई

बाहुबली 2 ने पहिल्या आठवड्य़ात 792 करोड रूपये कमाई करून पीके, दंगल या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत.

  • Share this:

05 मे : बाहुबली 2 ने सहा दिवसांत 792 कोटींची कमाई केलीये. जगभरात बाहुबली 2 ने 792 करोड रूपयाच्या टप्पा पार केला. बाहुबली 2 ने अनेक रेकॉर्ड मोडले असून देशासह विदेशात चित्रपट सुपरहिट ठरत आहे.

इंडिया डॉट कॉम च्या माहितीनुसार बाहुबली 2 ने पहिल्या आठवड्य़ात  792 करोड रूपये कमाई करून पीके, दंगल या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत.

या चित्रपटाच्या हिंदी आवृतीने सहा दिवसांत 375 करोड कमाई केली. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर 792 करोड रूपयाची कमाई करून इतिहास घडवलाय. बाहुबली 2 हा 28 एप्रिलपासून सुमारे 9000 चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार बाहुबली २ चे दिग्दर्शक लवकरच जपानी आणि चीनी भाषेत आवृती काढणार आहे.

बाहुबलीची फ्रेचायझिमुळे बॉलीवूडमध्ये प्रभासची घराघरात ओळख झाली आहे. त्याचा साहो चित्रपट येणार असून एकाच वेळी हिंदी, तामिळ, आणि तेलगु या भाषेत चित्रीत करण्यात येत आहे. युव्ही निर्मित साहो वम्सी आणि प्रमोद या चित्रपटाचे निर्मिते आहे. या चित्रपटाचे देशातील आणि विदेशातील विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 07:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...