बाॅक्स आॅफिसवर 'बाहुबली 2' ठरला बलवान, 1000कोटींचं नवं रेकाॅर्ड

बाॅक्स आॅफिसवर 'बाहुबली 2' ठरला बलवान, 1000कोटींचं नवं रेकाॅर्ड

'बाहुबली 2'नं नऊ दिवसांमध्ये बाॅक्स आॅफिसवर ही कमाई केलीय.

  • Share this:

07 मे : भारताच्या फिल्मी इतिहासात एक नवा रेकाॅर्ड झालाय. 'बाहुबली 2'नं 1000 कोटींची कमाई केलीय. आणि हा आकडा आणखी पुढे जाणार. 'बाहुबली 2'नं नऊ दिवसांमध्ये बाॅक्स आॅफिसवर ही कमाई केलीय.

'बाहुबली 2- द कन्क्लुजन'नं भारतात 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. तर परदेशात 200 कोटी कमावलेत. बाहुबली अजूनही हाऊसफुल सुरू आहे. त्यामुळे लवकरच 1500 कोटींचा टप्पा गाठेल, यात शंका नाही.

पहिल्या आठवड्यात या सिनेमानं भारतात 534 कोटींची कमाई केली. हिंदी बाहुबली सिनेमानं सगळ्या सिनेमांना मागे टाकलंय. 'दंगल'नं एका आठवड्यात 197.54 कोटी, 'सुलतान'नं एका आठवड्यात 229.16 कोटी कमावलेत. तर हिंदी 'बाहुबली 2'नं एका आठवड्यात 247 कोटींचा टप्पा गाठलाय. पीकेनं जगभरात 792 कोटी कमावले होते.

अमेरिकेतही हा सिनेमा हिट आहे. अमेरिकेत सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा होता दंगल. पण आतापर्यंत एस एस राजामौलीच्या बाहुबली 2नं 100 कोटींची कमाई केली.

First published: May 7, 2017, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading