VIDEO : ‘ DUS BAHANE 2.0 ’मध्ये श्रद्धा आणि टायगरचा बोल्ड अंदाज; बाघी 3 चित्रपटातील नवं गाणं रिलीज

VIDEO : ‘ DUS BAHANE 2.0 ’मध्ये श्रद्धा आणि टायगरचा बोल्ड अंदाज; बाघी 3 चित्रपटातील नवं गाणं रिलीज

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस’ या चित्रपटातील ‘दस बहाने’ या गाणं बाघी 3 चित्रपटाच्या मेकर्सनी पुन्हा रिक्रिएट केलं आहे. रीमेक गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : बाघी आणि बाघी 2 चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यावर आता बाघी 3 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच चित्रपटातील एक नवं गाणं रिलीज झालयं. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस’ या चित्रपटातील ‘दस बहाने’ या गाणं बाघी 3 चित्रपटाच्या मेकर्सनी पुन्हा रिक्रिएट केलं आहे. 'दस बहाने 2.0' पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफसोबत 'दस बहाने 2.0' हे गाणं शूट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा गाणं पुन्हा विशाल-शेखर यांनीच गायलं आहे.

'दस बहाने 2.0' हे गाणं बघताना आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो. टायगर श्रॉफ कधी हेलिकॉप्टरवर डान्स करताना दिसतो. तर कधी बर्फामध्ये थिरकताना दिसतो आहे. गाण्यात श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.

टायगर श्रॉफच्या अॅक्टींगसोबतचं टायगरच्या डान्सचेही चाहते दिवाने आहेत. टायगरची एक किलर मूव्ह बघण्यासाठी चाहते आतुरलेले असतात. या गाण्यात टायगरला श्रद्धाचीही चांगली साथ मिळत आहे. ‘ ABCD 2 ’ चित्रपटातून श्रद्धाचे डान्सिंग स्कील प्रेक्षकांसमोर आले होते. त्यामुळे या गाण्यात श्रद्धा आणि टायगरची केमिस्ट्री रंगत आणणार आहे.

एक्गजॉटिक लोकेशनवर शूट करण्यात आलं गाणं

गाण्याला अधिकाधिक पसंती मिळावी यासाठी मेकर्सनी हे गाणं एक्गजॉटीक लोकेशनमध्ये शूट करण्यात आलं आहे. बाघी आणि बाघी 2 चित्रपटही लार्जर दॅन लाईफ असे होते. त्यामुळे हा चित्रपटही तसाच असणार आहे. बाघी 3च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

येत्या 6 मार्चला बाघी 3 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच टायगरला वडिल जॅकी श्रॉफबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. जॅकी श्रॉफ या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत.

First published: February 12, 2020, 9:35 PM IST

ताज्या बातम्या