मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बसपन का प्यार' फेम Sahdev Dirdo ची हेल्थ अपडेट आली समोर;जाणून घ्या डिटेल्स

'बसपन का प्यार' फेम Sahdev Dirdo ची हेल्थ अपडेट आली समोर;जाणून घ्या डिटेल्स

 'बसपन का प्यार'  (Bachpan Ka Pyar)  फेम चिमुकला सहदेव दिरदो   (Sahdev Dirdo)  काल एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. छत्तीसगढमधील सुकमा येथे हा अपघात झाला होता.

'बसपन का प्यार' (Bachpan Ka Pyar) फेम चिमुकला सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) काल एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. छत्तीसगढमधील सुकमा येथे हा अपघात झाला होता.

'बसपन का प्यार' (Bachpan Ka Pyar) फेम चिमुकला सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) काल एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. छत्तीसगढमधील सुकमा येथे हा अपघात झाला होता.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 डिसेंबर-  'बसपन का प्यार'  (Bachpan Ka Pyar)  फेम चिमुकला सहदेव दिरदो   (Sahdev Dirdo)  काल एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. छत्तीसगढमधील सुकमा येथे हा अपघात झाला होता. ही माहिती समजताच या चिमुकल्याचे चाहते चिंतेत होते. त्यांनतर आता सहदेवच्या प्रकृतीबाबत महत्वाची बाब समोर आली आहे.

सहदेव दिरदो सध्या रुग्णालयात आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती आता स्थिर आहे. सध्या कोणतीही चिंतेची बाब नाही. काल रात्री उशिरा तो शुद्धीवर आला होता. प्रियांका शुक्ला यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे, की सहदेव हा १२ वर्षांचा चिमुकला आता शुद्धीवर आला आहे. तो सध्या आऊट ऑफ डेंजर आहे.सहदेव सध्या डॉक्टरांच्या नजरेखाली आहे. त्याची प्रकृतीत सुधारणा होत आहे.

सहदेव आपल्या मित्रांसोबत ट्रिपल सीट जात होता. अचानक बाईक घसरून हा अपघात झाला होता. यामध्ये त्याला डोक्याला मार लागला होता. बराच वेळ बेशुद्ध असल्याने त्याच्या कुटूंबासह चाहते चिंतेत होते. प्रसिद्ध गायक बादशहाने या घटनेची दखल घेत त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता. बादशहाने ट्विट करत आपण त्याच्या कुटुंबाच्या तसेच मित्रांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं होतं. तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पुढाकार घेत त्याच्या उपचारासाठी सर्वोत्तम डॉक्टरांची टीम पाठवण्याचे आदेश दिले होते.

(हे वाचा:'बसपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघातात गंभीर जखमी; बादशहाने ट्विट करत म्हटलं..)

'बसपन का प्यार व्हिडिओ'-

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक लहान मुलगा आपल्या शाळेत एक गाणं म्हणत असतो, तो मुलगा म्हणजे सहदेव दिरदो होता. आणि ते गाणं 'बसपन का प्यार' असं होतं. आपल्या बोबड्या गाण्यांच्या ओळीने सर्वांनाच वेड लावलं होतं. सोशल मीडियावर प्रत्येक मोठ्या सेलेब्रेटीने या गाण्यावर रील बनवला होता. या गाण्यामुळे या चिमुकल्याचं नशीब पालटलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाण्याची भुरळ प्रसिद्ध गायक-रॅपर बादशाहालासुद्धा पडली होती. त्यामुळेच त्याने सहदेवसोबत यावर एक सुंदर रॅप तयार केला होता.

First published:

Tags: Entertainment, Video viral