मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बसपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघातात गंभीर जखमी; बादशहाने ट्विट करत म्हटलं..

'बसपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघातात गंभीर जखमी; बादशहाने ट्विट करत म्हटलं..

'बसपन का प्यार'   (Bachpan Ka Pyar)  या गाण्यामुळे एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार बनलेला चिमुकला म्हणजे सहदेव दिरदो   (Sahdev Dirdo)  होय. सहदेव काल एका अपघातात गंभीर जखमी   (Sahdev Dirdo Accident)  झाला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29  डिसेंबर-  'बसपन का प्यार'   (Bachpan Ka Pyar)  या गाण्यामुळे एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार बनलेला चिमुकला म्हणजे सहदेव दिरदो   (Sahdev Dirdo)  होय. सहदेव काल एका अपघातात गंभीर जखमी   (Sahdev Dirdo Accident)  झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सहदेवचा छत्तीसगढजवळील सुकमा येथे हा अपघात झाला आहे. त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जबर दुखापत झाली आहे.सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रसिद्ध गायक बादशहाने ट्विट करत त्याच्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.

मंगळवारी रात्री या अपघाताची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सहदेव आपल्या मित्रांसोबत एका बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास करत होता.एके ठिकाणी रस्त्यावरील वाळू आणि खडकावरून त्यांची बाईक घसरली. त्यामुळे त्यांचा हा अपघात झाला आहे.  डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी एका स्थानिक रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्याला एका सुस्सज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक तास होऊनही तो बेशुद्ध अवस्थेतच होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटत आहे. सध्या सोशल मीडियावरून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत सहदेवला उत्तमोत्तम उपचार देण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनतर त्याला जगदलपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांशी संवाद साधून त्याला सुसज्ज रुग्णालयात हालवण्यात आलं आहे. तसेच बादशाहाने ट्विट करत या अपघाताची माहिती दिली आहे.त्याने म्हटलं आहे, मी सहदेवच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या संपर्कात आहे. तो सध्या बेशुद्ध आहे. त्याला रुग्णालयात नेलं जात आहे. मी त्याच्यासाठी उभा आहे. त्याला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे'.

सहदेवचा व्हायरल व्हिडीओ-

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक लहान मुलगा आपल्या शाळेत एक गाणं म्हणत असतो, तो मुलगा म्हणजे सहदेव दिरदो होता. आणि ते गाणं 'बसपन का प्यार' असं होतं. आपल्या बोबड्या गाण्यांच्या ओळीने सर्वांनाच वेड लावलं होतं. सोशल मीडियावर प्रत्येक मोठ्या सेलेब्रेटीने या गाण्यावर रील बनवला होता. या गाण्यामुळे या चिमुकल्याचं नशीब पालटलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाण्याची भुरळ प्रसिद्ध गायक-रॅपर बादशाहालासुद्धा पडली होती. त्यामुळेच त्याने सहदेवसोबत यावर एक सुंदर रॅप तयार केला होता.

First published:

Tags: Entertainment, Video viral