Home /News /entertainment /

'बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघातानंतर नव्या क्षेत्रात ठेवणार पाऊल, बॉलिवूडच्या या सेलेब्सप्रमाणे करणार हे काम

'बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघातानंतर नव्या क्षेत्रात ठेवणार पाऊल, बॉलिवूडच्या या सेलेब्सप्रमाणे करणार हे काम

बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघानंतर नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने इन्स्टा पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

    मुंबई, 15 जानेवारी-'बचपन का प्यार' (Bachpan Ka Pyar Song) या गाण्यानं छत्तीसगडचा बालकलाकार सहदेव दिरदो (Sahdev Dirdo)रातोरात स्टार बनला. सहदेवचा काही दिवसापूर्वी सुकमा (Sukma) जिल्ह्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहदेवला अपघातानंतर (Sahdev Dirdo Accident) बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मदतीचा हात दिला होता. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. 'बचपन का प्यार' या गाण्यानं घराघरात पोहोचलेल्या सहदेवने आता पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तो आता नॉन-फंजिबल टोकन (NFT ) सेक्टरमध्ये पाऊल ठेवणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करीत ही माहिती दिली. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सहदेवने सांगितले की, 'तो लवकरच त्याचे एनएफटी कलेक्शन लाँच करणार आहे. यासोबतच त्याने त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, माझ्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होईन अशी अपेक्षा असल्याचे त्याने सांगितले. यासोबतच त्याने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्सिंग स्टाफचे आभार देखील मानले. तसेच त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही त्याने आभार मानले.
    प्रसिद्ध अशा मेटाव्हर्सची मार्केटप्लेस ( metaverse marketplace ) नोफ्टनच्या सहकार्याने सहदेव मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणार आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेता सलमान खान, रजनीकांत, अभिनेत्री सनी लिओनी यांसारख्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही भारतात एनएफटी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आहे. वाचा-sushmita सोबतच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच बॉयफ्रेंड रोहमनने व्यक्त केली भावना एनएफटी म्हणजे काय ? एनएफटी हे एक नॉन-फंजिबल टोकन आहे, जे एक युनिक क्रिप्टो करन्सीचा प्रकार आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'बचपन का प्यार' द्वारे प्रसिद्धी मिळवणारा 10 वर्षांचा गायक आणि इंटरनेट सेन्सेशन सहदेव दिरदो @nOFTEN_NFT भारतातील सेलिब्रिटी मेटाव्हर्स मार्केटप्लेसर्ससह मेटाव्हर्समध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या स्टोअरमध्ये काय आहे ते तुम्ही पाहू इच्छिता ? त्यासाठी आताच nOFTEN.com वर जा!.' वाचा-मनमोहक गायत्री दातार! अभिनेत्रीनं केलं ट्रॅडिशनल PHOTOSHOOT सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. 'बचपन का प्यार' या गाण्यामुळे सहदेव देखील एका रात्रीत स्टार झाला होता. बालकलाकार सहदेव दिरदो याचा जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. सहदेवला रुग्णवाहिकेतून घेऊन जातानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तेव्हा त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना चाहते दिसत होते. आता तो बरा झाला आहे आणि नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याची सज्ज झाला आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून तर हेच स्पष्ट होतंय.
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या