मनोरंजन

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

बच्चन कुटुंबाची दिवाळी पार्टी रद्द? अभिषेक बच्चनने केला खुलासा

बच्चन कुटुंबाची दिवाळी पार्टी रद्द? अभिषेक बच्चनने केला खुलासा

दरवर्षी दिवाळीला बच्चन कुटुंबामध्ये मोठी पार्टी होते. पण यंदा ही पार्टी रद्द करण्यात आली आहे. स्वत: अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)ने याबाबत खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर: दिवाळीची तयारी सगळीकडे जोरदार सुरू आहे. दिवाळीचं शॉपिंगची लगबग, फराळाची तयारी करण्यात सगळेच जण व्यस्त आहेत. बॉलिवूडचे स्टार्सही मोठ्या उत्साहात दिवाळीचं सेलिब्रेशन करतात. बच्चन कुटुंब दरवर्षी दिवाळीची ग्रँड पार्टी (Diwali Party) देतं. या पार्टीमध्ये संपूर्ण बच्चन परिवार सहभागी होतो. श्वेता बच्चनही खास दिल्लीवरुन पार्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईला येते. पण यंदा दिवाळीच्या पार्टीचं आयोजन केलं जाणार नाही अशी माहिती मिळत आहे.

पार्टी का रद्द झाली?

अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)ने याबाबत स्वत: खुलासा केला आहे. अभिषेक म्हणाला, "माझ्या बहिणीच्या सासूचं अर्थात रितू नंदा यांचं याच वर्षी निधन झालं. आणि आत्ताची परिस्थिती बघता कोणालाही पार्टीचं सेलिब्रेशन करण्याचा फारसा उत्साह नाही. त्यामुळे यंदा आमच्या घरी होणारी दिवाळीची पार्टी रद्द करण्यात आली आहे." दिवाळीच्या उत्साहातही  फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे सगळे नियम पाळा असं आवाहन अभिषेकने चाहत्यांना केलं आहे.

कोरोनाबाबत बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला, "कोरोना (Corona) कोणाला कधी कसा होईल याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे पार्टीला लोकं जमले आणि त्यांच्यामुळे कोणाला कोरोना झाला तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या कोरोना काळात सर्वांनीच योग्य खबरदारी घ्यायला हवी." जुलै महिन्यात बच्चन कुटुंबातील जवळजवळ सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि छोट्या आराध्यालाही कोरोना झाला होता. पण या सर्वांनी जिद्दीने कोरोनावर मात केली.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 7, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या