मुंबई, 31 ऑगस्ट : बॉलिवुड अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) याने एक आर्टिकल जारी करीत नाराजी व्यक्त केली. यानंतर त्याने अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) आणि निर्माता-निर्देशक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्याबाबत आपलं मत समोर ठेवलं आहे. एका ट्विटर यूजरने रणवीर शौरी याला ट्विटरवर टॅग करीत विचारलं की या आर्टिकलवर त्याचं काय मत आहे? या आर्टिकलचं हेडिंग होतं, पूजा भट्ट आणि रणवीर शौरी अब्यूसिव्ह रिलेशनशिपमध्ये होते.
यावर युजरने सवाल केला आहे की, पीआर स्टोरी केव्हा संपणार? रणवीर शौरीने सांगितले की, हे लोक शक्तीशाली आहेत. हे लोक मला त्रास देत होते. कोणी मीडियातील व्यक्तीने हे आर्टिकल समोर आणले आहे, ज्या व्यक्ती जुने रेकॉर्ड आणि पोलीस रिपोर्ट पाहत नाहीत. अन्यथा अशा प्रकारच्या बातम्या छापणार नाहीत. त्यांना माहिती नाही की पूजा भट्ट, महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मला खूप त्रास दिला.
Yeah simply look at their editorial standards, to someone else photo they written your name in the caption. Not one or twice FOUR times the same 'mistake' is being made.
Yeah simply look at their editorial standards, to someone else photo they written your name in the caption. Not one or twice FOUR times the same 'mistake' is being made.
इतकचं नाही तर एका मुलाखतीत रणवीर शौनीने सांगितले होते की, 2002 पासून ते 2005 यादरम्यान देशाबाहेर जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नव्हता. त्यांच्याबाबत वाईट गोष्टी पसरल्यामुळे त्यांना येथे राहणे अवघड झाल्याची भावना रणवीर याने व्यक्त केली. त्याने पुढे सांगितले की, त्याच्या विरोधात जे लोक काम करीत होते, ते खूप पॉवरफूल होते.