चित्रपटातील 'या' सिनमुळे 'बाहुबली-2'ला 'ए' सर्टिफिकेट

चित्रपटातील 'या' सिनमुळे 'बाहुबली-2'ला 'ए' सर्टिफिकेट

  • Share this:

17 मे : 'बाहुबली-2'नं देशचं नाही तर जगभरातील सिनेरसिकांना अक्षरश: 'याड' लावलंय. पण या सिनेमाबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाहुबली-2ला सेन्साॅर बोर्डाने चक्क 'ए' सर्टिफिकेट दिलं आहे.

बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. सिनेमात चित्रीत केल्या गेलेल्या या सिनमुळे सिंगापूरमधील सेन्सॉर बोर्डानं 'बाहुबली-२' ला 'ए' सर्टिफिकेट देऊन सगळ्यांनाच चकित केलंय.

(व्हिडिओ कर्टसी : यू-ट्यूब)

हा सिनेमा खूपच हिंसक आहे. त्यातील काही दृश्यं अंगावर येणारी, मनावर परिणाम करणारी आहेत. ती 16 वर्षांखालील मुलांनी पाहण्यायोग्य नाहीत, असं निरीक्षण नोंदवत सिंगापूर सेन्सॉर बोर्डानं बाहुबली-२ ला 'यूए' सर्टिफिकेट नाकारलं आहे.

दरम्यान, या अजब तर्कटाद्वारे त्यांनी भारतीय सेन्सॉर बोर्डालाही मागे टाकल्याची खिल्ली सिनेप्रेमी उडवत आहेत. अर्थात, हा प्रकार सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच घडलेला नाही. याआधी 'ब्युटी अँड द बीस्ट' या डिस्नेच्या चित्रपटालाही त्यांनी 'ए' सर्टिफिकेट दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading