बाॅक्स आॅफिसवरही 'बाहुबली'च, अवघ्या तीन दिवसांत तब्बल 540 कोटींची कमाई

बाॅक्स आॅफिसवरही 'बाहुबली'च, अवघ्या तीन दिवसांत तब्बल 540 कोटींची कमाई

जगभरात बाहुबली-2 ने तीन दिवसांत 540 कोटींची कमाई करत या सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत

  • Share this:

02 मे : अवघ्या तीन दिवसांत 500 कोटींची कमाई करून या सिनेमाने हे दाखवून दिलंय की आपण बॉक्स ऑफिसचेही' बाहुबली ' आहोत. भारतासह जगभरात रिलीज झालेल्या बाहुबली-2 ने ही अद्भुत किमया साधलीय. बाहुबली-2 च्या हिंदी व्हर्जनचे निर्माते आणि वितरक असणाऱ्या करण जोहर यांनी याबाबत एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, बाहुबली-2 हिंदीने शुक्रवारी 41 कोटी, शनिवारी 40.5 कोटी तर रविवारी 46.5 कोटींची कमाई केलीय. म्हणजेच या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने वीकेंड पर्यंत एकूण 128 कोटींची कमाई केलीय.

एखाद्या तमिळमधून हिंदीत डब केलेल्या सिनेमाचे हे यश नक्कीच डोळे दिपवणारं आहे, यात शंका नाही. भविष्यात एखाद्या बॉलिवूड सिनेमाला हा रेकॉर्ड तोडणं कठीण जाईल. परंतु प्रत्येक रेकॉर्ड हा तुटण्यासाठीच तयार झालेला असतो, हेदेखील विसरून चालणार नाही.

जगभरात बाहुबली-2 ने तीन दिवसांत 540 कोटींची कमाई करत या सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत,असं बॉक्स ऑफिसवर नजर ठेवणाऱ्या ट्रेड रमेश बाला यांनी जाहीर केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 09:52 PM IST

ताज्या बातम्या