मुंबई, 5 डिसेंबर : 'बाहुबली' फेम अभिनेता राणा डग्गुबती सध्या चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत येणामागचं कारण म्हणजे, त्याने ट्विट करत इंडिगो एअरलाइन्सवर ताशेरे ओढले आहेत. राणाने ट्विट शेअर करत त्याचा एअरलाइन्ससोबतचा वाईट अनुभव शेअर केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हारल होत असून तो चर्चेचा विषय ठरत आहे. यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनीही त्याला समर्थन करत संताप व्यक्त केला.
अभिनेता राणा डग्गुबतीने संताप व्यक्त करत म्हटलं, 'भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट एअरलाइन अनुभव @Indigo 6 E! फ्लाइटच्या वेळेबद्दल कोणतीही माहिती नाही. हरवलेली वस्तू सापडलेली नाही. कर्मचाऱ्यांना सुगावा नाही? यापेक्षा वाईट काय असू शकते!' अभिनेत्याला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुटुंबासह बेंगळुरूला जात असताना हा अनुभव आला. या ट्विटनंतर जेव्हा लोकांनी अभिनेत्याचे समर्थन केले आणि एअरलाइनला फटकारण्यास सुरुवात केली, तेव्हा कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली.
राणा डग्गुबतीच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याच्या समर्थनाला आणि एअरलाइनला ट्रोल करण्यास सुरुवात केली तेव्हा इंडिगोने माफी मागितली. ट्विटला इंडिगोने उत्तर दिले की, 'झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, कृपया काळजी करू नका, आमची टीम तुमचे सामान लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी काम करत आहे.'
दरम्यान, हैदराबाद विमानतळावर विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर सर्वांना दुसरे विमान घेण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी सर्व सामान इकडून तिकडे गेले होते. मात्र, एखाद्या सेलिब्रिटीने एअरलाइनविरोधात ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Airplane, Airport, South film, South indian actor