1.5 कोटींचं फक्त जिम, शाहरुख- अमिताभ यांच्यापेक्षाही दुप्पट महाग गाडी वापरतो हा सुपरस्टार

1.5 कोटींचं फक्त जिम, शाहरुख- अमिताभ यांच्यापेक्षाही दुप्पट महाग गाडी वापरतो हा सुपरस्टार

सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जर त्याला कोणती गाडी आवडली तर ती गाडी घरी घेऊन येतो.

  • Share this:

हैदराबाद, 12 मे- दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासला जगभरात 'बाहुबली' सिनेमामुळे ओळख मिळाली. या सिनेमाचे दोन्ही भाग जगभरात गाजले. आता प्रभासने कोणतीही छोट्यात छोटी गोष्ट केली तरी त्याची बातमी होती. फार कमी लोकांना माहीत आहे की प्रभासला महागड्या गाड्यांमध्ये फिरण्याचं वेड आहे. तसेच त्याला राजेशाही जीवन जगायला आवडतं.

मध्यरात्री ‘सैफिना’सोबत डिनर डेटला गेले अर्जुन- मलायका

मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासला महागड्या गाड्या एवढ्या आवडतात की, सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जर त्याला कोणती गाडी आवडली तर ती गाडी घरी घेऊन येतो. प्रभासकडे 196.35 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय प्रभासकडे 68 लाख रुपयांची एसयूव्ही गाडी आहे. तसेच 1.5 कोटीचं जिमही आहे. त्याला हे जिम बाहुबलीच्या निर्मात्यांनी भेट म्हणून दिले होते.

मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला अदनान सामीने दिलेल्या गिफ्टची किंमत ऐकाल तर...

एसयूव्हीशिवाय प्रभासकडे 2.08 कोटींची सेडान गाडी आहे. हैदराबादमध्ये त्याचं 60 कोटी रुपयांच फार्महाउसही आहे. एवढंच नाही तर 8 कोटी रुपयांच्या गाडीतून फिरतो. ही गाडी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याकडे असणाऱ्या गाड्यांपेक्षा महागडी आहे.

कधीही आई होणार नाही कविता कौशिक, जाणून घ्या कारण

प्रभासच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो साहो सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असणार आहे. श्रद्धाचा हा पहिला दाक्षिणात्य सिनेमा असेल. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार असल्यामुळे सध्या प्रभास हिंदी शिकण्यावर भर देत आहे.

Happy Mother's Day 2019: या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे आईसोबतचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

First published: May 12, 2019, 4:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या