भल्लालदेवच्या म्हणजेच राणा दग्गुबातीच्या फक्त एकाच डोळ्याला दृष्टी!

भल्लालदेवच्या म्हणजेच राणा दग्गुबातीच्या फक्त एकाच डोळ्याला दृष्टी!

  • Share this:

1 मे :  सध्या जगभरात 'बाहुबली-2'ची क्रेझ आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडत कमाईचे नवे रेकॉर्ड तयार केले आहेत. पण जितका हिच बाहुबली ठरतोय, तितकंच सिनेमातल्या कलाकारांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता अशीच चर्चा रंगलीये ती या सिनेमाचा खलनायक भल्लालदेव याची. भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबातीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा हाॅट अभिनेता चक्क एक डोळा पूर्णपणे अधू असून, त्याला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं. मात्र, आजपर्यंत इतक्या सिनेमात त्याला पाहूनही जराही कुणाला याची भणक लागली नाही.

राणा दग्गुभटी बॉलिवूडच्या परिचयास आला ते 'दम मारो दम' या सिनेमामुळे. य़ा सिनेमात त्याची आणि बिपाशा बासुची जोडी चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा ही रंगू लागल्या होत्या. एका मुलाखती दरम्यान बोलताना बिपाशाने राणाच्या अधू दृष्टीचा उल्लेख केला होता.  तेव्हा अनेकांना हे नेमकं काय आहे असा प्रश्न पडला. पण 'बाहुबली-2' रिलीज झाला आणि या र्चचांना पुन्हा एकदा उधाण आलं ते एका व्हायरल झालेल्या क्लिपमुळे.

एका तेलगू वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबातीनंच हा धक्कादायक खुलासा केला आहे. "माझ्या एका डोळ्याने मला दिसत नाही. मी खुप लहान असताना माझ्या उजव्या डोळ्याचं कॉर्नियल ट्रान्सप्लान्ट करण्यात आलं होतं, पण तरीही मला उजव्या डोळ्याने दिसत नाही. मी जर डावा डोळा बंद केला तर मी ठार अंधला आहे", असंही त्यानं म्हटलं आहे.

बाहुबली-2 सिनेमातील भल्लादेवची भूमिका साकरणारा अभिनेता राणा दग्गुबाती संपूर्ण देशातच नव्हे, तर परदेशातही तितकाच लोकप्रिय झाला आहे. त्याचा रौद्र अवतार भव्य दिव्स असा सिनेमाचा कॅनवास आणि त्यात त्याचे फाईट सीन्स, या सगळ्यात त्याला एका डोळ्याने दिसंतच नाही हे नेमकं कसं शक्य आहे?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 05:14 PM IST

ताज्या बातम्या