• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • परी हरवल्याचा तो एपिसोड पाहून मायराचा भाऊ लागला रडू , Cute VIDEO VIRAL

परी हरवल्याचा तो एपिसोड पाहून मायराचा भाऊ लागला रडू , Cute VIDEO VIRAL

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) मालिकेत परी हरवल्याचा भाग पाहून मायरा भाऊ लागला रडू. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई. 23 ऑक्टोबर : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) मालिका कमी वेळेत प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालितकेतील परीचे पात्र तर सर्वांचे लाडके पात्र आहे. परीचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो परीच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. काही तर ही मालिका फक्त परीसाठी पाहतात. या मालिकेच्या एका भागात सर्वांची लाडकी परी (mayara vaykul) हरवल्याचे दाखवण्यात आलं. मात्र परी म्हणजे मायराचा खराखुरा भाऊ रियू (mayara vaykulbrother riyu) जेव्हा हा भाग पाहतो तेव्हा तो भावनिक झाला होता. त्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मालिकेत एका भागात परी आणि काकांना परांजपे वकील वेगळं करतो आणि काकांना त्यांच्या घरी घेऊन येतो. तर इकडे परांजपेंच्या सांगण्यावरून त्याचाच माणूस परीला घेऊन तिला घरी नेण्याचं नाटक करतो. शिवाय परांजपे वकील काकांना त्यांच्या घरी नेऊन परी हरवली म्हणून नेहाला फोने करून सांगतो. जेव्हा नेहा रडत रडत घरी येते तेव्हा मी परीला घरी आणल्याशिवाय इथे येणार नाही काही करून मी परीला आणणारच असं वाचन देखील देतो. परी हरवल्याचा क्षण पाहून प्रेक्षक तर हाळवे झालेच मात्र हा क्षण जेव्हा टीव्हीवर प्रसारित झाला तेव्हा तिच्या घऱातील मंडळींनी देखील कॅमेऱ्यात कैद केला आहे. वाचा : VIDEO : माझा होशील ना मालिकेतील आदित्य सध्या करतोय 'हे' काम हा व्हिडिओ World Of Myra and Family या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. भाव बहिणीच्या व्हिडिओला त्यांनी “फुलोंक तारोंका सबका केहना हे एक हजारोमे मेरी भान हे” हे गाणं जोडलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहताना आणखीनच भावनिक होत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायल होत आहे. यामध्ये मायरा त्याच्या भावाला प्रेमानी मिठी मारताना दिसत आहे सोबतच ती तिच्या लहान भावाचे डोळे देखील पुसत आहे. हा क्षण पाहून प्रेक्षक मात्र भावनिक झाले आहेत. मायराची आई आणि वडील तिचे हे अकाउंट चालवतात. मायराचे या चॅनेलच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. वाचा, Jeev Mazha Guntala : सुहासिनीच्या एका निर्णयामुळे अंतराच्या संकटात वाढ मायरा मालिकेतील कलाकारांसोबत विविध गाण्यावर रील करत असते. तिचे रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. मालिकेत येण्यापूर्वीच मायारा तिच्या रीलमुळे तसेच व्हिडिओमुळे चर्चेत होती. आता परीच्या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: