मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सरोगसीद्वारे झाला होता आमिर-किरणच्या मुलाचा जन्म; या कारणामुळे घेतलेला मोठा निर्णय

सरोगसीद्वारे झाला होता आमिर-किरणच्या मुलाचा जन्म; या कारणामुळे घेतलेला मोठा निर्णय

आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी (Aamir Khan and Kiran Rao Divorced) एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मुलगा आझादचा एकत्र सांभाळ करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 03 जुलै : अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी (Aamir Khan and Kiran Rao Divorced) एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे. मात्र, मुलासाठी आम्ही समर्पित पालक म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही मुलगा आझादचा (Son of Aamir Khan and Kiran Rao) एकत्र सांभाळ करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.

मि. परफेक्शनिस्टचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं! आमिर खान आणि किरण राव यांनी घेतला तलाक

किरण राव आणि आमिर खान यांचा मुलगा आझाद हा सध्या दहा वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. किरणच्या गर्भधारणेत अडचणी आल्यामुळे सरोगसीचा निर्णय या जोडप्यानं घेतला होता. त्यानंतर 2011 मध्ये आझादचा जन्म झाला होता. आता आमिर आणि किरण वेगळे होत असले तरीही आझादसाठी ते समर्पित पालक म्हणून कायम राहाणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

KGF फेम यशनं घेतला कोट्यवधींचा बंगला; पाहा ड्रिम हाऊसचे Inside Photos

दोघांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेृं आहे की, 'आम्ही वेगळे होत आहोत. पण, मुलासाठी आम्ही समर्पित पालक म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही मुलगा आझादचा एकत्र सांभाळ करू. भविष्यात आम्ही एकत्र कामदेखील करत राहू. गेल्या १५ वर्षांचा आमचा सहवास खूप चांगला होता. या पंधरा वर्षाच्या काळात आम्ही संपूर्ण जीवनाचा आनंद घेतला आहे. आमचं नातं विश्वास, आदर आणि प्रेमावर टिकून राहिलं. आता आम्ही एका नव्या जीवनाची सुरुवात करणार आहोत मात्र पती आणि पत्नी म्हणून नाही.

First published:

Tags: Aamir khan, Bollywood News, Divorce