Shubh Mangal Zyada Saavdhan आयुष्मानने घातलेल्या नोजपिनची चर्चा, नव्या सिनेमात दिसला शर्टलेस लुक

आयुष्मान खुराना प्रत्येक भूमिकेतून काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करत असतो. Shubh Mangal Zyada Saavdhan या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच याची झलक दिसते आहे. समलिंगी पुरुषाची भूमिका करताना त्यानं चक्क नोजपिन घातली आहे आणि तरीही तो कुठल्याही साचेबद्ध भूमिकेपेक्षा वेगळा दिसला आहे...

  • Share this:

दोन पुरुषांच्या प्रेमाची गोष्ट असल्याचं 'शुभमंगल ज्यादा सावधान' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवरून लक्षात येतं. आयुष्मानने यात समलिंगी पुरुषाची भूमिका केली आहे.

या ट्रेलरमध्ये दिसणारी आयुष्मानची 'नोजपिन' सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे.

समलिंगी पुरुषांच्या हक्कांबाबत या चित्रपटात भाष्य असेल असं दिसतं. आयुष्मान आणि जितेंद्र कुमारचा लिप लॉक सीनही ट्रेलरमध्ये आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे'मधला सिम्रन आणि राजचा तो फेमस ट्रेन पकडण्याचा सीन या सिनेमातही दिसतोय.

आयुष्मान खुराना त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. नोजपिन घातलेली असली, तरी कुठलेही साचेबद्ध हावभाव यात त्याने केलेले दिसत नाहीत. म्हणूनच त्याच्या या नोजपिन लुकवर चाहते फिदा आहेत.

फक्त नोजपिनच नाही, तर या अशा LGBT चा उघड पुरस्कार करणाऱ्या बिनधास्त तरुणाची भूमिका आयुष्मानने केली आहे.

आयुष्मानच्या या शर्टलेस लुकवरही चाहते फिदा झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2020 08:38 PM IST

ताज्या बातम्या