आयुष्मान खुरानाने सुरू केली 'भंगीविरोधी' मोहीम, सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ

Article 15 Ayushmann Khurrana खुरानाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट शेअऱ करत म्हटलं की, 'आपण सर्व एक समान आहोत आणि हे माहीत असूनही आपण भेदभाव करतो.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 03:19 PM IST

आयुष्मान खुरानाने सुरू केली 'भंगीविरोधी' मोहीम, सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ

मुंबई, 24 जून- आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' या सिनेमाच्या ट्रेलरला जेवढ्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत तेवढ्याच चांगल्या प्रतिक्रिया या सिनेमाच्या प्रमोशनलाही मिळत आहेत. 'आर्टिकल १५' मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्मानने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वेगवेगळ्या मुद्यांचे अनेक व्हिडिओ शेअर केले. यातल्या एका व्हिडिओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना #DontSayBhangi च्या याचिकेवर स्वाक्षरी करण्याचा आग्रह केला. नुकताच आयुष्मानने या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. खुरानाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट शेअऱ करत म्हटलं की, 'आपण सर्व एक समान आहोत आणि हे माहीत असूनही आपण भेदभाव करतो. आपलं संविधानही याची परवानगी देत नाही. तुम्हीही आज एक शपथ घ्या आणि आजच #DontSayBhangi याचिकेवर स्वाक्षरी करा.'

...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया

 

Loading...

View this post on Instagram

 

Hum sab ek saman hai, aur yeh jaante hue bhi hum bhedbhav karte hai. Humara samvidhan bhi humein isski ijaazat nahi deta. Aap bhi lijiye ek shapath. Sign the petition #DontSayBhangi, today. Click link in bio @anubhavsinhaa @zeestudiosofficial @zeemusiccompany #ManojPahwa #KumudMishra @talwarisha #nassar @sayanigupta @mohdzeeshanayyub @ashishsverma @ronjinichakraborty @shubhro30 #SushilPandey #AakashDhabade #KumudMishra @gauravkapata @benarasmediaworks #Article15

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

आता हिंदी सोडून भोजपुरी शिकतेय सनी लिओनी, VIRAL VIDEO

एकीकडे इन्व्हेस्टिगेटीव्ह ड्रामाने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे आयुष्मानचे कट्टर चाहते त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात 'आर्टिकल १५' शी निगडीत एक व्हिडिओ दाखवण्यात आला. हा एक असा सिनेमा आहे, जो प्रत्येक व्यक्तिकडे समाजात बदल आणण्याची मागणी करत आहे आणि सगळ्यांनाच सिनेमाची टॅग लाइन 'अब फर्क लाएंगे' प्रमाणे वागण्याचं आवाहन करत आहे.

लंडन फिल्म फेस्टिवल हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा फेस्टिवल मानला जातो. तिथे या सिनेमाच्या माध्यमातून फेस्टिव्हलचं उद्धाटन होणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली असून येत्या २८ जूनला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी रूप्साने जिंकले 15 लाख रुपये, झाली Super Dancer 3ची विजेती

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...