Home /News /entertainment /

आयुष्मानला ‘गे’ भूमिकेत पाहिल्यावर मुलाची धक्कादायक प्रतिक्रिया, पत्नीनं केला खुलासा

आयुष्मानला ‘गे’ भूमिकेत पाहिल्यावर मुलाची धक्कादायक प्रतिक्रिया, पत्नीनं केला खुलासा

वडीलांना 'गे' भूमिकेत पाहिल्यावर आयुष्मानच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा आयुष्माची पत्नी ताहिरा कश्यपनं नुकताच केला.

  मुंबई, 28 जानेवारी : बॉलिवूडची हिट मशीन म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात आयुष्मान एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात आयुष्मान पहिल्यांदाच 'गे' तरुणाची भूमिका साकारत आहे. पण वडीलांना अशा भूमिकेत पाहिल्यावर आयुष्मानच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा आयुष्माची पत्नी ताहिरा कश्यपनं नुकताच केला. ताहिरानं तिच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरून याचा खुलासा केला. आपल्या मुलाची प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्याही डोळ्यात पाणी तरळलं असंही ताहिरानं यावेळी सांगितलं. तिनं लिहिलं, वडीलांच्या शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर मी आमच्या 8 वर्षांच्या मुलाला विचारलं, तुला होमोसेक्शुअलिटी किंवा ‘गे’चा अर्थ माहित आहे का? त्यावर तो म्हणाला हो. मी पुन्हा विचारलं तुला त्याबद्दल काही समस्या आहे का? त्यावर त्यानं उत्तर दिलं यामध्ये कोणतीही समस्या असण्याचं कारण काय? त्याचं हे उत्तर ऐकल्यावर माझ्याही डोळ्यात पाणी आलं. ‘माझं कुटुंब तुटेल अशा गोष्टीला मी पाठिंबा देऊ शकत नाही’, पूजा भटचा CAA ला विरोध काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत आयुष्मान सांगितलं होतं की त्याच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ सिनेमाचा ट्रेवर पाहिल्यावर त्याच्या आई-वडीलांची प्रतिक्रिया काय होती. आयुष्मान म्हणाला, त्यांना माझ्या सिनेमाचा ट्रेलर खूप आवडला. त्या दोघांनी अनेक हा ट्रेलर पाहिला. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला या ट्रेलर एन्जॉय करताना पाहिलं, तेव्हा मला विश्वास बसला की आमच्या टीमची मेहनत वाया गेलेली नाही. सर्व प्रेक्षक या सिनेमाशी फक्त कनेक्टच होणार नाहीत तर त्यांच्यात हा नवा विचार रुजण्यासही मदत होईल. माझ्या आई-वडीलांनी मला सांगितलं की त्यांना माझा अभिमान वाटतो. कारण तो एका सामाजिक विषयावर सिनेमा तयार करत आहे. आई-वडीलांच्या लग्नाआधीच झाला अभिनेत्रीचा जन्म, ब्रेकअपनंतर गेली नशेच्या आहारी
  View this post on Instagram

  Happy bday jaan!

  A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

  View this post on Instagram

  Chacha @aparshakti_khurana and bhatija! #unconditionallove #soccerboys #matchingoutfits #happiness

  A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on

  ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमात आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात जितेंद्र सुद्धा ‘गे’ भूमिकेत आहे. याशिवाय या सिनेमात नीना गुप्ता आणि गजराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हितेश यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा 21 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. शहांचा भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवणावर ताव, अभिनेत्रीला सुचला फिल्मी डायलॉग
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Aayushman khurana, Bollywood

  पुढील बातम्या