आयुष्यमान खुरानाला वाढदिवशी मिळाली Bad न्यूज, रिलीजच्या 24 तासांनंतर 'ड्रीमगर्ल' लीक

आयुष्यमान खुरानाला वाढदिवशी  मिळाली Bad न्यूज, रिलीजच्या 24 तासांनंतर 'ड्रीमगर्ल' लीक

'ड्रीम गर्ल' रिलीजनंतर अवघ्या काही तासांत ऑनलाइन लीक झाल्यामुळे आता याचा थेट परिणाम या सिनेमाच्या कलेक्शनवर पडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना आणि नुसरत भारुचा यांचा बहुचर्चित सिनेमा 'ड्रीम गर्ल' नुकताच रिलीज. रिलीज पुर्वीच या सिनेमातील आयुष्यमानच्या भूमिकेमुळे सिनेमाची सर्वत्र हवा होती. पहिल्याच दिवशी या सिनेमानं 10.05 कोटीची ओपनिंग कमाई केली. अशा कमाई करणारा आयुष्यमानचा हा पहिलाच सिनेमा ठरला. मात्र रिलीजच्या अवघ्या 24 तासांनंतरच हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.

'ड्रीम गर्ल' रिलीजनंतर अवघ्या काही तासांत ऑनलाइन लीक झाल्यामुळे आता याचा थेट परिणाम या सिनेमाच्या कलेक्शनवर पडण्याची शक्यता आहे. या सिनेमाचं बजेट 30 कोटी रुपयांचं आहे. आयुष्यमानच्या वाढदिवसाला रिलीज झालेल्या हा सिनेमा अवघ्या काही तासांत लीक झाल्यानं आयुष्यमानसाठी ही वाईट बातमीच म्हणावी लागेल. तसेच या सिनेमाच्या लीक होणं मेकर्ससाठीही नुकसानकारक ठरु शकतं.

VIRAL PHOTOS मुळे पिवळ्या साडीतली 'ती' अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत

सध्या हा सिनेमा पायरेटेड डाउनलोडसाठी अनेक वेबसाइटवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे सिनेमा लीक होण्याची पहिलीच वेळ नाही याआधीही प्रभासचा 'साहो', कंगना रणौत आणि राजकुमार राव यांचा 'जजमेंटल है क्या'  हे सिनेमा सुद्धा अशाचप्रकारे लीक झाले होते.  या अगोदर अनेक दाक्षिणात्य सिनेमा सुद्धा असेच लीक होत असत मात्र या अवैध साइट्सनी बॉलिवूड इंडस्ट्रीची सुद्धा झोप उडवली आहे. यामुळे अनेक बिग बजेट सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही असाच परिणाम दिसून आला आहे.

'स्वराज्य जननी जिजामाता'मध्ये छोट्या जिजाऊंनी केलं धाडस कारण...

'ड्रीम गर्ल' सिनेमात आयुष्यमान अशा मुलाची भूमिका साकारत आहे. जो मुलीच्या आवाजात दुसऱ्या पुरुषांशी बोलत असतो. आयुष्यमान आपल्या टॅलेंटच्या जोरावर एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवतो. त्याचठिकाणी तो पुजा बनून आपल्या गोड आवाजानं सर्वांना आपल्या प्रेमात पाडतो. मात्र त्यानंतर जो गोंधळ उडतो त्यातून त्याला बाहेर काढायला त्याची प्रेयसी माही म्हणजेच नुसरत भारुचा आणि मित्र स्मायली म्हणजेच मनज्योत सिंह मदत करतात.

Bigg Bossमध्ये होणार 'हे' बदल, सलमानच्या मानधनापासून ते थीमपर्यंत सर्वच चर्चेत

===============================================================

फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील काही खास क्षण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 10:48 AM IST

ताज्या बातम्या