'अभिनेत्यालाही KISS करण्यासाठी तयार...', 'शुभमंगल...' मधील किसिंग सीनवर आयुष्मानची प्रतिक्रिया

'अभिनेत्यालाही KISS करण्यासाठी तयार...', 'शुभमंगल...' मधील किसिंग सीनवर आयुष्मानची प्रतिक्रिया

‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर विशेष गाजला कारण यामध्ये आयुष्मान आणि जितेंद्रने किसिंग सीन दिला आहे. या चित्रपटात आयुष्मान सोबत ‘कोटा फॅक्टरी’ फेम जितेंद्र कुमार स्क्रीन शेअर करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : चौकटीबाहेरच्या चित्रपटांची निवड, सुरेल आवाज आणि हटके अभिनय- ही ओळख आहे बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची. आता समलैंगिकतेवर आधारीत ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा सिनेमा घेऊन आयुष्मान प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आयुष्मान सोबत ‘कोटा फॅक्टरी’ फेम जितेंद्र कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. समलैंगिकता अजूनही आपल्या देशात निषिद्ध मानली जाते. ‘समाज काय म्हणेल’ या प्रश्नाभोवतीच अनेकजण गुरफटलेले पाहायला मिळतात. अशावेळी ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ सारखा सिनेमा करण कौतुकास्पद आहे. ‘शुभमंगल...’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘शुभमंगल...’चा ट्रेलर आणि गाण्यांना लोकांची विशेष पसंती मिळाली आहे.

‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर विशेष गाजला कारण यामध्ये आयुष्मान आणि जितेंद्रने किसिंग सीन दिला आहे. ‘चित्रपटाची गरज असेल तर मी अभिनेत्री असेल किंवा अभिनेता, कुणालाही किस करायला तयार आहे.’ अशी प्रतिक्रिया आयुष्मान खुराना याने दिली आहे. आयुष्मान पुढे म्हणाला की, ‘काही वर्षांपूर्वी गे पार्टीमध्ये मला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी मी खूप अनकम्फर्टेबल होतो. मात्र ही गोष्ट 2004-05 मधील आहे. गेल्यावर्षी आणखी एका फिल्मच्या प्रमोशनवेळी मी एका गे कपलला किस करताना पाहिलं. तेव्हा माझी खात्री पटली की आता आपला देश समलैंगिकतेवर आधारित चित्रपट पाहण्यासाठी तयार आहे.’

(हेही वाचा- मणिकर्णिका नंतर कंगना साकारणार 'एअरफोर्स पायलट', 'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित)

चित्रपटाचे दिग्दर्शक हितेश केवल्याने ही संकल्पना सांगितल्यानंतर लगेचच आपण चित्रपटासाठी तयार झाल्याचं आयुष्मान सांगतो. दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आयुष्मानने त्याची ही मतं मांडली आहे. ‘मी आता LGBTQ Supporter आहे’,असंही आयुष्मान सांगतो. किसिंग सीन या चित्रपटातील आवश्यक आणि महत्त्वाचा सीन असल्याचं आयुष्मान सांगतो. त्याचप्रमाणे जर एखादा अभिनेता समलैंगतेबाबत खुले विचार मांडत असेल तर ही भूमिका करण्यासाठी त्याला कोणतीच समस्या नसली पाहिजे असंही आयुष्मान म्हणाला.

या चित्रपटात जितेंद्र कुमार आणि आयुष्मानची जोडी खूपच छान दिसत आहे. आपल्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबाबत समजाऊन सांगताना हे दोघेजण दिसतात. कार्तिक आणि अमन अशी या दोघांच्या कॅरेक्टरच नावं आहेत. नुकत्याच गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्येही आयुष्मान-जितू एकत्र दिसले. जितेंद्र कुमारने इन्स्टाग्रामवर फिल्मफेअर सोहळ्यातील फोटोदेखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

Kartik-Aman 🏳️‍🌈 #shubhmangalzyadasaavdhan #filmfare2020😍♥️🎊🎉💃🕺

A post shared by Jitendra Zyada Kumar (@jitendrak1) on

First published: February 17, 2020, 1:59 PM IST

ताज्या बातम्या