Dream Girl : 'ढगाला लागली कळ.....' वर थिरकणार हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता

सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारणारा आयुष्यमान पहिल्यांदाच मराठी गाण्यावर थिरकणार आहे.

  • Share this:

अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या त्याचा आगमी सिनेमा ‘ड्रीम गर्ल’मुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

आयुष्यमान खुराना नेहमीच त्याच्या अनोख्या आणि हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यामुळेच की त्याचे सिनेमा हिट होतात. पण या सिनेमात तो थोड्या वेगळ्या भूमिकेत दिसत असून प्रेक्षक त्याच्या या सिनेमाची आतुरतेन वाट पाहत आहेत.

ड्रीम गर्ल सिनेमाच्या राधे राधे या गाण्यावर धम्माल डान्स केल्यानंतर आयुष्यमान पुन्हा एकदा असं काही करण्याच्या तयारीत आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

आगामी सिनेमा ड्रीम गर्लमध्ये आयुष्यमान आणि नुसरत भारुचा पहिल्यांदाच मराठी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. हे गाणं एका लोकप्रिय मराठी गाण्याचं रिमिक्स असणार आहे.

मराठी अभिनेता दादा कोंडके यांचं गाणं ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याचं रिमिक्स आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल’ सिनेमात वापण्यात येणार आहे. ज्यावर आयुष्यमान आणि अभिनेत्री नुसरत भारुचा डान्स करताना दिसणार आहे.

 सिनेमाच्या भूमिकांसाठी वेगवेगळे प्रयोग करणारा आयुष्यमान पहिल्यांदाच मराठी गाण्यावर थिरकणार आहे. नुकतंच या गाण्याचं शूट सुरू झालं असून लवकरच हे गाणं रिलिज होणार आहे.

आयुष्यमान खुराना आणि नुसरत भारुचा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल’ 13 सप्टेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 06:24 PM IST

ताज्या बातम्या