आयशा झुल्काच्या कुत्र्याची हत्याच; अभिनेत्रीच्या बंगल्याचा केअरटेकर गजाआड

आयशा झुल्काच्या कुत्र्याची हत्याच; अभिनेत्रीच्या बंगल्याचा केअरटेकर गजाआड

काही दिवसांपूर्वीच आयशा झुल्काच्या (ayesha jhulka) बंगल्यातील पाण्याच्या टाकीत रॉकी मृतावस्थेत सापडला होता.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : अभिनेत्री आयशा झुल्काच्या (Ayesha Jhulka) कुत्र्याच्या (dog) मृत्यूचा गूढ अखेर उकललं आहे. आयशाचा सहा वर्षांचा कुत्रा रॉकीची हत्याच झाल्याचं समोर आलं आहे. आयशाच्या लोणावळ्याच्या बंगल्याचा केअरटेकर राम आंद्रेला अटक करण्यात आली आहे. तिथंच हा कुत्रा मृतावस्थेत सापडला होता.

काही दिवसांपूर्वीच आयशा झुल्काच्या लोणावळ्यातील बंगल्यातील पाण्याच्या टाकीत रॉकीचा मृतदेह सापडला. या बंगल्याचा केअरटेकर राम आंद्रेने कुत्रा पाण्याच्या टाकीत पडल्याचं सांगितलं होतं. मात्र साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांनुसार संशयाची सुई रामकडेच जात होती.

आयशाच्या बंगल्याशेजारील बंगल्यातील स्टाफने राम रॉकीचा छळ करत असल्याचं सांगितलं. शिवाय आयशाच्या बहिणीनेदेखील रामने तिच्या दोन्ही कुत्र्यांना एका खोलीत बंद केल्याचं पाहिलं होतं आणि अखेर आता रामला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.  त्याला आपीसी कलम 429 अंतर्गत अटक करण्यात आलं आहे.

हे वाचा - संगीत विश्वाला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे निधन

या प्रकरणाचा तपास करणारे सब इन्स्पेक्टर बळीराम सांगळे यांनी सांगितलं की, "ऑटोप्सीनुसार कुत्र्याचा मृत्यू गुदमरून झाला आहे. शेजारील बंगल्याच्या स्टाफच्या जबाबानुसार आणि आयशाच्या बंगल्यातून मिळालेल्या काही पुराव्यानुसार आंद्रेला अटक करण्यात आली आहे"

"अनेक लोकांनी याबाबत आपला जबाब दिला. त्यांनी आंद्रे कुत्र्याचा छळ करत असल्याचं सांगितलं. बंगल्यातील एका खोलीच्या बेडशीटवर रक्ताचे डागही सापडलेत. याचा रिपोर्ट आता येणं बाकी आहे", असंही सांगळे यांनी सांगितलं.

हे वाचा - 'लाल सिंग चढ्ढा'त असाही दिसणार आमिर खान; VIRAL VIDEO तील लूक पाहून व्हाल हैराण

याआधी आयशाची बहिणीने सांगितलं होतं की, ती आणि तिचा पती जेव्हा या बंगल्यात आला तेव्हा बंगल्यातील दोन्ही कुत्र्यांना एका खोलीत बंद केलं होतं. तिनं याबाबत आयशाला सांगितलं. आयशाने याबाबत आंद्रेला जाब विचारल्यावर त्याने दोन्ही कुत्रे एकमेकांसोबत भांडत असल्याचं कारण त्याने दिलं होतं.

Published by: Priya Lad
First published: September 28, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या