मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra मध्ये खरंच पायात बूट घालून मंदिरात गेला रणबीर कपूर? वाद सुरू होताच दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra मध्ये खरंच पायात बूट घालून मंदिरात गेला रणबीर कपूर? वाद सुरू होताच दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

या सीनमध्ये रणबीर कपूर पायांत बूट घालून मंदिरातील घंटा वाजवताना दिसत होता. ट्रेलरमधील हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ ही मोहीम सुरू केली.

या सीनमध्ये रणबीर कपूर पायांत बूट घालून मंदिरातील घंटा वाजवताना दिसत होता. ट्रेलरमधील हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ ही मोहीम सुरू केली.

या सीनमध्ये रणबीर कपूर पायांत बूट घालून मंदिरातील घंटा वाजवताना दिसत होता. ट्रेलरमधील हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ ही मोहीम सुरू केली.

मुंबई 20 जून : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि ट्रेलर रिलीज होताच तो चर्चेत आला. प्रेक्षक रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे ट्रेलर पाहून रणबीरचे फॅन्स आनंदी झाले होते. मात्र, काही वेळानंतर हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर (Social Media) जोर धरू लागली, त्याचं कारण होतं ट्रेलरमधील एक सीन. या सीनमध्ये रणबीर कपूर पायांत बूट घालून मंदिरातील घंटा वाजवताना दिसत होता. ट्रेलरमधील हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ ही मोहीम सुरू केली. दरम्यान, या सीनमुळे सुरू असलेल्या गोंधळावर ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) प्रतिक्रिया दिली आहे.

KGF 2 वर Karan Johar झाला व्यक्त, 'बॉलिवूडमध्ये जर असा सिनेमा बनवला असता तर...'

अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्रच्या व्हायरल सीनबद्दल सोशल मीडिया पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं आहे. या सीनमध्ये रणबीर एका सजवलेल्या मंदिर परिसराकडे धावताना दिसतो. ज्याच्या बाहेर 'दसरा उत्सव' असं लिहिलं आहे. या सीनबद्दल स्पष्टीकरण देताना अयान म्हणाला की, रणबीरने बूट घालून मंदिरात प्रवेश केलेला नाही. अयान म्हणाला की, ट्रेलरमध्ये रणबीर कपूर जिथे गेला आहे, ते मंदिर नसून, दुर्गापूजेचा मंडप आहे. 'आम्हाला काही लोकांकडून कळलं की, आमच्या ट्रेलरमध्ये रणबीरने बूट घालून मंदिराची घंटा वाजवलेल्या सीनमुळे लोक नाराज आहेत.

चित्रपटाचा दिग्दर्शक आणि देवाचा भक्त या नात्याने जे घडतंय त्याबद्दल मला नम्रपणे बोलायचं आहे. आमच्या चित्रपटात रणबीर मंदिरात प्रवेश करत नसून, दुर्गा पूजेच्या मांडवामध्ये प्रवेश करत आहे. माझं कुटुंब 75 वर्षांपासून अशा दुर्गापूजेचं आयोजन करत आहे, ज्याचा मी लहानपणापासूनच एक भाग राहिलो आहे.’

अयान मुखर्जीने पुढे लिहिलंय की, 'माझ्या अनुभवाप्रमाणे आम्ही स्टेजवर देवीच्या पुढे जाण्यापूर्वी बूट काढतो, मांडवामध्ये प्रवेश करताना पायांत बूट असले तरीही चालतात. या सीनमुळे दु:खी झालेल्या प्रत्येकापर्यंत मी पोहोचू शकावं,’ हे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण, ब्रह्मास्त्र हा भारतीय संस्कृती (Indian Culture), परंपरा आणि इतिहासाचा गौरव करणारा चित्रपट आहे. यामुळेच मी हा चित्रपट तयार केला आहे. ब्रह्मास्त्र पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’ या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

Kartik Aaryan & Karan Johar: करण जोहर-कार्तिक आर्यनचा वाद मिटला;'या'अभिनेत्याने दोघांना आणलं एकत्र?

ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडेच लग्नबंधनात अडकलेल्या रणबीर-आलिया या सेलिब्रिटी कपलचा एकत्र हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouny Roy) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ब्रह्मास्त्रमध्ये एक कॅमिओदेखील केला आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor