मुंबई, 19 डिसेंबर- आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. क्वचितच कोणाला माहिती असेल, की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोन कलाकारांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. अयान मुखर्जीच्या (Ayan Mukharji) दिग्दर्शनाखाली 2017 मध्ये 'ब्रह्मास्त्र'चं शूटिंग सुरू झालं होतं.रणबीर आणि आलिया हे दोघेही फिल्मी बॅकग्राउंडमधून असल्यानं ते एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती.नुकताच या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं एक असा खुलासा केला आहे की, ते ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
अयान मुखर्जीचा मोठा खुलासा-
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'चं मोशन पोस्टर १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालं. यावेळी चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं स्वतः एक मोठा खुलासा केला आणि सांगितलं की, आपल्या चित्रपटापूर्वी आलिया-रणबीरला कोणीही एक कपल म्हणून पाहू नये अशी माझी इच्छा होती. अयाननं सांगितलं कि, या दोघांनी एकत्र कुठेही दिसू नये यासाठी मी गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या पाठीमागे लागलो आहे. पोस्टर लाँचच्या वेळी अयाननं स्वतः कबूल केलं की त्याच्यामुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी करता आलेल्या नाहीत.
View this post on Instagram
अयान मुखर्जी पुढं म्हणाला की, जेव्हा आम्ही सर्वजण चित्रपटाच्या शूटिंगवर पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटलं की आलिया आणि रणबीरची कास्टिंग सर्वोत्तम आहे. दोघे एकत्र खूप छान दिसत होते. त्यानंतर जेव्हा चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली.
अयान मुखर्जीनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना जगाच्या नजरेपासून वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यानं म्हंटल, जेव्हा कधी दोघे एकत्र असायचे किंवा एकत्र बाहेर जायचे तेव्हा मी मागे राहायचो आणि म्हणायचो की तुम्ही दोघे माझा चित्रपट खराब करत आहात, कृपया एकत्र बाहेर जाऊ नका.
(हे वाचा:कतरिना कैफच्या हातावर असा चढलाय विकीच्या प्रेमाचा रंग!)
सध्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट, रणबीर कपूर आई अयान मुखर्जी यांनी दिल्लीमध्ये चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज केलं. त्यांनतर काल ते हैद्राबादमध्ये प्रमोशनसाठी पोहोचले होते. यावेळी साऊथ सुपरस्टार नागार्जूनसुद्धा उपस्थित होते. मोशन पोस्टर पहिल्यापासून चाहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता आणखी वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Entertainment, Ranbir kapoor