कोणतीही लक्षण न दिसताही होऊ शकतो कोरोना, अभिनेत्याच्या ट्वीटमुळे खळबळ

कोणतीही लक्षण न दिसताही होऊ शकतो कोरोना, अभिनेत्याच्या ट्वीटमुळे खळबळ

आणखी एका अभिनेत्याला या व्हायरसची लागण झाली असून या व्हायरस कोणतीही लक्षण दिसून न येताही त्याची टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली.

  • Share this:

मुंबई, 17 मार्च : सध्या जगभरात CoronaVirus नं अक्षरशः थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे जगात आतापर्यंत हजारोंच्या संख्येनं बळी गेले आहे. यातून सेलिब्रेटी सुद्धा सुटलेले नाहीत. काही दिवासांपूर्वी हॉलिवूडचे सुप्रसिदध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन, गेम ऑफ थ्रोन्स अभिनेता क्रिस्टोफर हिवजू, अभिनेत्री आणि मॉडेल ओल्गा कुरिलेन्कोने या सेलिब्रेटींनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं. अशातच आता आणखी एका हॉलिवूड अभिनेत्याला या व्हायरसची लागण झाली आहे आणि विशेष म्हणजे या अभिनेत्याला या व्हायरस कोणतीही लक्षण दिसून न येताही त्याची टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली.

कोरोना व्हायरस झालेल्या सेलिब्रेटीच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्याच्या नावाची भर पडली आहे. अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमातील अभिनेता एद्रिस एल्बा याला सुद्धा कोरोनाची लागण झाली असून त्यांनं त्याच्या ट्वीटरवरुन याची माहिती दिली आहे.

अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या 'सुनो ना...'चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO

एद्रिसनं लिहिलं, आज सकाळीच मला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. खरं तर इतरांसारखं मला कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसून आलं नाही. मात्र खबरदारी म्हणून केलेल्या टेस्टमध्ये मला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, स्वतःकडे दुर्लक्ष करु नका आणि शक्यतो घरीच थांबा.

दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा

 

View this post on Instagram

 

Thanks to @ooreethirah for a great NYE party! #ooreethirah #OOMoments 📸 @creationsofla

A post shared by Idris Elba (@idriselba) on Jan 23, 2020 at 4:04am PST

एद्रिसच्या आधी आजच गेम ऑफ थ्रोन्स अभिनेता क्रिस्टोफर हिवजूनंही त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली. त्यानं लिहिलं, मला हे सांगताना दुःख होत आहे की मी कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. मी आज माझे कुटुंबीय घरीच उपचार घेत आहोत. आमची तब्येत ठिक असून आम्हाला फक्त थंडीची लक्षणं दिसत आहेत. बऱ्याच लोकांसाठी हा व्हायरस अत्यंत घातक ठरला आहे. त्यामुळे सर्वांना यासंबंधी योग्य ती काळाजी घेण्याची विनंती करतो.

रणबीर-आलियाचा KISS करतानाचा फोटो व्हायरल, पण मलायकाचं सिक्रेट झालं उघड

 

View this post on Instagram

 

Greetings from Norway! Sorry to say that I, today, have tested positive for COVID19, Corona virus. My familiy and I are self-isolating at home for as long as it takes. We are in good health - I only have mild symptoms of a cold. There are people at higher risk for who this virus might be a devastating diagnosis, so I urge all of you to be extremely careful; wash your hands, keep 1,5 meters distance from others, go in quarantine; just do everything you can to stop the virus from spreading. Together we can fight this virus and avert a crisis at our hospitals. Please take care of each other, keep your distance, and stay healthy! Please visit your country's Center for Disease Control's website, and follow the regulations for staying safe and protecting not just yourselves, but our entire community, and especially those at risk like the elderly and people with pre-existing conditions. @grymolvaerhivju #fightcorona #solidarity #takecare #folkehelseinstituttet Thanks to @panoramaagency

A post shared by Kristofer Hivju (@khivju) on Mar 16, 2020 at 1:48pm PDT

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

Coronairus चं देशात थैमान, अमृता सुभाषनं शेअर केलेलं हे गाणं देईल नवी उमेद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading