मुंबई, १४ मार्च २०१९- एवेंजर्स सीरिजमधील शेवटचा सिनेमा २०१८ मध्ये आला होता. आता या सीरिजमधील नवा सिनेमा एवेंजर्स एंडगेम भारतात २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे सिनेमाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा भारतात इंग्रजीशिवाय हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये डब करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सगळे सुपरहिरो जगाच्या सुरक्षेसाठी एकत्र येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये मागील भागातील काही सीन दाखवण्यात आले आहेत.
The countdown begins... #AvengersEndgame new poster... Mark the date: 26 April 2019. pic.twitter.com/sxDZ8YQv1b
— taran adarsh (@taran_adarsh) March 14, 2019
गेल्या भागातील क्लायमॅक्समध्ये थानोस समोर सर्वसामान्य लोकांपासून सुपरहिरोचंही काही चालत नव्हतं. यात आयनमॅन, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, आणि आंटमॅन वाचले होते. सुपरहिरोंचीही टीम जगाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. ट्रेलरमध्ये रॉबर्ट डाउनी आणि पेपर पॉट्सचा आवाज ऐकू येतो. या सिनेमाचं दिग्दर्श रुसो ब्रदर्सचे एंथोनी रुसो आणि जोए रुसो यांनी केला आहे.
एका रिपोर्टनुसार अभिनेत्री जेनिथ पेल्ट्रोही शेवटची एवेंजर्स एंडगेममध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिने पेपर पॉट्सची व्यक्तिरेखा साकारली आहे. एका मुलाखतीत जेनिथ म्हणाली की, ‘माझं वय वाढत आहे. सिनेमात मी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या त्याबद्दल मी खरंच समाधानी आहे. आयनमॅनच्या पहिल्या भागापासून ते अव्हेंजर्स सीरिजपर्यंत एवेंजर्स सीरिजचा प्रवास अविस्मरणीय होता.’ भारतात हॉलिवूड सिनेमांचे चाहते फार आहेत. मार्वलचा प्रत्येक सिनेमा भारतात आवडीने पाहिला जातो.
VIDEO: कोकणातला होलीकोत्सव पाहिला का?