एवेंजर्सचं अॅडव्हेंचर पडलं भारी, महिलेला करावं लागलं रुग्णालयात दाखल

एवेंजर्सचं अॅडव्हेंचर पडलं भारी, महिलेला करावं लागलं रुग्णालयात दाखल

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एवेंजर्स एंडगेम या सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. जगभरात हा सिनेमा पाहण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत.

  • Share this:

बंगळुरू, 29 एप्रिल- गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एवेंजर्स एंडगेम या सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. जगभरात हा सिनेमा पाहण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत. भारतात तर सकाळी ६ वाजल्यापासूनचे शो सुरू करण्यात आले आहेत. यावरून भारतात एवेंजर्सचे किती कट्टर चाहते आहेत याचा अंदाज येऊ शकतो.

फक्त बॉलिवूड स्टारच नाही तर या मराठी सेलिब्रिटींनीही केलं मतदान

या सिनेमाच्या वेडापायी नुकेतच एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बंगळुरू येथे रात्रा १० वाजताचा शो पाहण्यासाठी एक महिला थिएटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. पण थिएटरच्या बाहेर एवढी गर्दी होती की तिला दुखापत झाली आणि त्या महिलेला रुग्णालयात भरती करावं लागलं. शनिवारी २७ एप्रिलला ही घटना घडली. व्हाइटफिल्ड येथील सिनेपोलीफोरम शांतिनिकेतन थिएटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. अपघातानंतर महिलेला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आलं जिथे तिच्या ओठाला टाके घालण्यात आले.

फक्त अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडच नाही तर या अभिनेत्रीही लग्नाआधी राहिल्यात गरोदर

असं म्हटलं जातं की, शो सुरु होण्याच्या फक्त तीन मिनीट आधी थिएटरच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे थिएटरच्या आत जाण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होतं. हा अपघात झाला. दरम्यान, चीनमध्येही अशीच काहीशी घटना घडली.

मतदान केंद्रावर वरुण धवनने केली वृद्ध महिलेची मदत, उपस्थित म्हणाले वाह.. वाह...

चीनमध्ये थिएटरमध्ये सिनेमा सुरू असताना एक चाहती एवढी भावुक झाली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रिपोर्टनुसार ती चाहती हायपर वेन्टीलेशन अवस्थेत गेली होती. ती एवढी जास्त रडली की, तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तिचे हात पाय सुन्न पडू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण सिनेमात ती भावुक होत होती. मात्र सिनेमाच्या शेवटी ती जास्त भावुक झाली आणि जोर जोरात रडू लागली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजन देण्यात आला आणि तिचा श्वास नियंत्रणात आणण्यात आला.

VIDEO : शाहरुख खान सहकुटुंब पोहोचला मतदानाला!

गेल्या शुक्रवारी २६ एप्रिलला हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला. तरुणाईवर या सिनेमांची क्रेझ एवढी आहे की, पहिल्याच दिवशी या सिनेमाने जगभरात १ हजार कोटींची कमाई केली. तर भारतात या सिनेमाने पहिल्या दिवशी जवळपास ६० कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसांच्या कमाईनंतर हा सिनेमा सहज १०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन बसला.

VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या