मुंबई, 23 डिसेंबर: गायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, जज अशा अनेक रुपातून अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte) आपल्या भेटीला आहे. प्रेक्षकांना नेहमीच हटके देण्याचा प्रयत्न अवधूत गुप्ते करत असतो. आताही त्याच्या नव्या गाण्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवधूतचं हे नवं गाणं त्याच्या नेहमीच्या गाण्यांपेक्षा अतिशय वेगळं आहे. मराठीमध्ये रॅप साँग हा प्रकार तसा नवीनच आहे. अवधूतचं नवं गाणं रॅप साँग आहे.
कसं आहे अवधूतचं गाणं?
अवधूत गुप्तेच्या नव्या गाण्याचं नाव 'जात' असं आहे. या गाण्यातून रॅप साँगच्या बाजातून त्याने जाती व्यवस्थेवर भाष्य केलं केलं आहे. या गाण्यात सामाजिक संदेश देण्याचा अवधूतचा प्रयत्न आहे. या गाण्याचे गीतकार समीर सावंत आहेत तर संगीतकार विक्रम बाम आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा अवधूतने व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
मराठीमध्ये पहिल्यांदा ‘रिमिक्स’ हा गाण्याचा प्रकार आणण्याची किमया अवधूतनेच केली होती. आता मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी तो रॅप साँगची मेजवानी आणणार आहे. ऐका दाजीबा, मधुबाला अशी अनेक गाणी त्याने आजपर्यंत गाजवली आहे. झेंडा, कान्हा, बॉइज, रेगे, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मोरया असे त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. आता जात या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं आहे.