मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai Kuthe Kay karte : आई कुठे काय करते मालिकेचं नाव बदला; प्रेक्षकांचा सल्ला, तुम्हीही व्हाल शॉक

Aai Kuthe Kay karte : आई कुठे काय करते मालिकेचं नाव बदला; प्रेक्षकांचा सल्ला, तुम्हीही व्हाल शॉक

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

महाराष्ट्राची लाडकी मालिका आई कुठे काय करतेचं नाव बदलून टाका अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  24 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्राला आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही देखील ही मालिका माहिती आहे. मालिकेतील अरुंधती हे पात्र सगळ्यांच्या परिचयाचं झालं आहे. प्रत्येक घरात असणाऱ्या आईचं प्रतिनिधीत्वचं जणू काही अरुंधती करतेय असं सर्वांना जाणवलं आणि प्रेक्षकांनी अरुंधतीला डोक्यावर घेतलं. आई कुठे काय करते या वाक्यावर महाराष्ट्रातील तमामा आईचं दु:ख मालिकेनं पहिल्या काही महिन्यात मांडलं आणि मालिका काही दिवसात हिट झाली. पण जस जस मालिकेचं कथानक पुढे सरकलं तसे अनेक ट्विस्ट अँड टर्न मालिकेत सुरू झाले. कधी ते प्रेक्षकांना आवडले तर काही चांगलेच डोक्यात गेले. आता तर मालिकेच्या दिग्दर्शकानं मालिकेच नावं बदलून टाकावं असा सल्ला प्रेक्षकांनी दिला आहे.

आई कुठे काय करते हा मालिकाचे फार सेंसिटिव्ह आणि भावुक विषय होता. पहिले काही महिने हा विषय उत्तमरित्या हाताळला गेला. पण सध्या मालिकेत सुरू असलेला ट्रॅक प्रेक्षकांच्या काही पचनी पडलेला दिसत नाही.

हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : 'मी तुझ्यावर खुप...'; अखेर आशुतोष व्यक्त करणार अरुंधतीवरचं प्रेम

अनिरुद्धचं संजनाबरोबर अफेअर असल्याचं कळल्यानंतर अरुंधती अनिरुद्धपासून घटस्फोट घेते आणि देशमुखांचं घर सोडून दुसऱ्या घरी शिफ्ट होते. याचवेळी अरुंधतीचा शालेय मित्र आशुतोष तिच्या आयुष्यात आला आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचं नात जुळण्याच्या वाटेवर आहे. दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना यांचं लग्न झालंय पण तरीही अनिरुद्ध अरुंधतीची बाजू घेतोय. इकडे अभि आणि अनघा आई बाबा होणार आहे मात्र तरीही आता अभिच्या आयुष्यात दुसरी संजना येण्याच्या वाटेवर आहे. तिकडे यश आणि गौरीचं मात्र काहीस स्टेबल आयुष्य पाहायला मिळतयं.

एकूणचं काय तर मालिकेत सध्या आई सोडून बाकी इतर पात्रांना फार जास्त महत्त्व दिलं जात आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.  अनिरुद्ध तर काय काय करतोय याचा काहीच नेम नाही. आता तर संजना देखील गरोदर असल्याचं दाखवण्यात येणार आहे. हे सगळं बघून प्रेक्षकांनी मात्र मालिकेचं नाव बदलून टाका असा सल्ला दिला आहे. मालिकेचं नाव 'आई कुठे काय करते' असण्यापेक्षा 'कोण कुठे लफडी करू शकतो', असं ठेवा, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर एका प्रेक्षकांनं केलेली ही कमेंट फारच चर्चेत आली आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment