Home /News /entertainment /

Atul Kulkarni on Laal Singh Chaddha: आमिर खानने फक्त 30 सेकंदात लाल सिंग चढ्ढा चित्रपटाला होकार का दिला? अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं कारण

Atul Kulkarni on Laal Singh Chaddha: आमिर खानने फक्त 30 सेकंदात लाल सिंग चढ्ढा चित्रपटाला होकार का दिला? अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं कारण

आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित चित्रपट 'लाल सिंग चढ्ढा' (Laal Singh Chaddha) चा ट्रेलर काल मोठ्या दिमाखात रिलीज झाला. या ट्रेलरला बरीच वाहवा मिळाली. अतुल कुलकर्णी या मराठीतील कुशल अभिनेत्याचं या चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. ते काय आहे नक्की समजून घेऊया.

पुढे वाचा ...
    मुंबई 30 मे: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)सध्या जोरदार प्रमोशन्स करताना दिसत आहे. आमिरचा 'लाल सिंग चढ्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या चमूमध्ये एका यशस्वी मराठी अभिनेत्याचं सुद्धा नाव आहे तो अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. (Atul Kulkarni) अतुल कुलकर्णीने या चित्रपटाच्या पटकथा लेखनाचं काम पाहिलं आहे. आमिर त्याच्या बहुचर्चित 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाचं प्रमोशन करण्याच्या लगबगीत सध्या फिरताना दिसत आहे. कालंच या चित्रपटाचा ट्रेलर आयपीएल 2022 फायनल मॅचच्या दरम्यान रिलीज झाला होता. आमिर खानने चक्क कॉमेंट्रेटरच्या खुर्चीत बसून मॅचची मजा अनुभवली. आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे अतुल कुलकर्णीचं वेगळं रूप या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपटाची कथा हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाशी असून अतुलने एरीक रॉथ यांच्या मूळ कथेचं भारतीय रूपांतर केलं आहे. अतुलने या चित्रपटावर अनेक वर्षांआधी काम सुरु केलं होतं. तरीही या चित्रपटाला बनायला तब्ब्ल 10 वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. यावर स्पष्टीकरण देताना बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अतुल सांगतो, "या चित्रपटाचा प्रवास बराच मोठा आहे. मी जवळपास 10 वर्षांपूर्वी यावर काम करायला सुरवात केली होती. ही प्रोसेस बरीच मोठी होती. राईट्स घेण्यासाठी जवळपास 7-8 वर्षांचा कालावधी लागला." आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरवातीला आमिर या चित्रपटाशी संबंधित सुद्धा नव्हता. मात्र अचानक असं काय झालं की आमिरने क्षणात या चित्रपटासाठी हो म्हणलं? यावर अतुल असं सांगतो, "आमिरने बरेच दिवस ही कथा ऐकली नाही. त्याला बहुधा असं वाटत होतं की मी चांगली कथा लिहिलेली नाही. आमची भेट अनेकदा व्हायची पण कधी स्क्रिप्टवर बोलणं झालं नाही. पण 2-3 वर्षांनी जेव्हा त्याने स्क्रिप्ट ऐकली त्याला एवढी आवडली की त्याने अक्षरशः 30 सेकंदाचा अवधीही न घेता या चित्रपटासाठी होकार दिला." अतुलने पुढे असं सांगितलं, "आम्ही अनेक वर्ष राईट्स घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. कारण ही मूळ कथा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप' ची आहे. आमिरने अमेरिकेला अनेक फेऱ्या मारल्या आणि शेवटी आम्हाला तब्ब्ल 7-8 वर्षांनी राईट्स मिळाले." हे ही वाचा-  Laal Singh Chaddha Trailer: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'ही PK सारखा, ट्रेलर पाहून नेटकरी संतापले असंही समजलं जातं की कोविडच्या मोठ्या संकटामुळे चित्रपटाच्या शूटिंगला बराच अवधी लागला. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेला 'फॉरेस्ट गंप' हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला असून त्याला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केलं होतं. टॉम हँक्सला सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. जीवन जगण्याचं एक गोड रहस्य सांगणारा हा चित्रपट अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो. आता लाल सिंग चढ्ढा हे करण्यात यशस्वी ठरतो का हे पाहावं लागेल. लाल सिंग चढ्ढा चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood actor, Bollywood News

    पुढील बातम्या