अथिया शेट्टीने शाळेतला रडका फोटो केला शेअर, खोड काढणारी चिमुरडी आहे 'या' अ‍ॅक्शन हिरोची बहिण

अथिया शेट्टीने शाळेतला रडका फोटो केला शेअर, खोड काढणारी चिमुरडी आहे 'या' अ‍ॅक्शन हिरोची बहिण

अथिया शेट्टी (Athiya shetty) इन्स्टाग्रामवर “पोस्ट अ पिक्चर ऑफ” या ट्रेंडच्या (Trend) माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होती. यावेळी तिच्या चाहत्याने केलेल्या विनंतीनरून तिने तिचा शाळेतला (School days photo) एक विचित्र फोटो शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya shetty) शनिवारी एका वेगळ्याच कारणामुळे इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहे. यावेळी तिने तिचा शालेय जीवनातला (school days photo) एक शेअर केला होता. हा फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) आता बराच व्हायरल होत आहे. आथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर “पोस्ट अ पिक्चर ऑफ” (Post a Picture of) या ट्रेंडमध्ये सहभाग नोंदवला होता. या ट्रेंडच्या माध्यमातून आथिया आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होती. यावेळी तिच्या एका फॅनने तिला शालेय जीवनातला फोटो शेअर करण्याची विनंती केली. या चाहत्याच्या विनंतीला मान देवून आथियाने तिचा एक शालेय जीवनातला एक विचित्र फोटो शेअर केला. यामध्ये ती कोणत्या तरी कारणावरून जोरात रडताना दिसत आहे.

चाहत्याची विनंती पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्वत: चा सर्वात विचित्र फोटो निवडला आहे. ज्यामध्ये कृष्णा श्रॉफ तिला छेडताना दिसत आहे. तर अथियाने तिचा रडका चेहरा बनवला आहे. या दोघांचा हा फोटो खूप जुना असून दोघांनी लाल रंगाचा लाइफ जॅकेट परिधान केलेलं दिसत आहे.

आथिया शेट्टी ही बॉलिवूडचा आण्णा सुनिल शेट्टीची मुलगी आहे, तर कृष्णा श्रॉप ही जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण आहे. या फोटोशिवाय अथियाने तिचा भाऊ अहान सोबतचाही बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

अथिया शेट्टी सध्या भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज के एल राहुलला डेटींग करताना दिसत आहे. हे दोघंही नेहमी एकमेकांच्या पोस्टवर आकर्षक कमेंट करत असतात. शिवाय अलीकडेच अथियाने के एल राहुलच्या वाढदिवशी एक दोघांचा एकत्रित फोटो शेअर केला होता. यामध्ये दोघंही लवी डवी पोजीशनमध्ये दिसत आहेत. या फोटोला कॅपशन देताना, अथियाने लिहिलं की, 'हॅपी बर्थडे, माय पर्सन' तिने या फोटोत के एल राहुलला टॅग देखील केलं आहे.

निखिल अडवाणीच्या 'हिरो' चित्रपटातून अथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सूरज पंचोलीने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ती अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रूझ यांच्यासोबत मुबारकां या चित्रपटात दिसली होती. अथिया सर्वात अलीकडे 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात ती दिसली होती, ज्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत काम केलं होतं.

Published by: News18 Desk
First published: January 16, 2021, 11:37 PM IST

ताज्या बातम्या