मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

3 महिन्यात KL राहुलशी लग्न करणाऱ्या अथिया शेट्टीनं केला मोठा खुलासा; सुनील शेट्टीनंही सोडलं मौन

3 महिन्यात KL राहुलशी लग्न करणाऱ्या अथिया शेट्टीनं केला मोठा खुलासा; सुनील शेट्टीनंही सोडलं मौन

के एल राहुलशी (Athiya Shetty and K L Rahul marriage in 3 months) विवाह होण्याच्या बातम्यांवर अथिया शेट्टीने स्वतःच्या सोहळा मीडियावरून खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणाली (Sunil Shetty daughter) सुनील शेट्टीची लेक?

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 13 जुलै: (Athiya Shetty and K L rahul wedding) सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुलच्या लग्नाच्या बातम्या सध्या जोर धरताना दिसत होत्या. हे कपल येत्या तीन महिन्यात बोहल्यावर चढणार असल्याचं समोर येत होतं. पण या बातमीत किती तथ्य आहे यावर अथियाने स्वतःच खुलासा केला असल्याचं पाहायला मिळत आहे. अथियाने आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून एक स्टोरी शेअर करत लग्नाच्या या बातम्यांवर खुलासा केला आहे. ती असं म्हणते, “अशा करते की तीन महिन्यांनी होणाऱ्या माझ्या या लग्नाला मी ही इन्वाइटेड असेन” असं लिहीत तिने एक हसण्याचा ईमोजी सुद्धा पोस्ट केला आहे. यावरून तरी त्यांच्या लग्नाच्या (Athiya Shetty and K L rahul wedding rumors) बातमीत सध्या तरी काही तथ्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. अथियाच्या आधीच तिच्या वडलांनी म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा लग्नाच्या अफवांवर पडदा टाकत असं स्पष्ट केलं होतं की अथियाच्या लगनबद्दल अजून कोणतंही प्लॅनिंग झालेलं नाही तसंच लग्नाची कोणती तयारी चालू नसल्याचं पण त्यांनी स्पष्ट केलं होतं. सध्या तरी सुनील शेट्टी यांनी लेकीच्या लग्नाच्या बातम्यांवर पूर्णविराम लावल्याने अनेक चाहते निराश झाले आहेत. अथिया आणि के एल च्या लग्नाची माहिती समोर आल्यावर अनेक ठिकाणाहून या कपलवर शुभेच्छांचा पाऊस पडताना दिसत होता. त्यांचे अनेक चाहते लग्नाच्या बातमीने सुखावले होते. मात्र आत्ता समोर आलेल्या या माहितीने चाहत्यांमध्ये बरीच निराशा दिसून येत आहे. हे ही वाचा- सारा अली खानच्या 'डेटिंग प्रपोजल'वर साऊथ स्टार विजय देवरकोंडाने दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाला अभिनेता? अथिया आणि राहुलबद्दल सांगायचं तर हे दोघे गेल्या साधारण दोन-तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरी त्यांचे एकमेकांसोबत अनेक फोटो दिसून येतात. एकमेकांवर प्रेम दाखवण्याचा आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्याची संधी दोघेही सोडत नाहीत असं अनेकदा दिसून आलं आहे. अथिया आणि राहुल एकत्र सुद्धा अनेकदा दिसून येतात.
वर्क फ्रंटवर अथिया म्हणावा तसा परफॉर्मन्स दाखवू शकली नाहीये. अथियाने हिरो, मुबारका अशा सिनेमात अभिनयाची झलक दाखवली आहे पण तिचा एकही चित्रपट सुपरहिट यश मिळवू शकला नाही. या अभिनेत्रीचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त आहे.
First published:

Tags: Kl rahul, Sunil shetty, Wedding

पुढील बातम्या