मुंबई, 22 एप्रिल- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर, केएल राहुल
(KL Rahul) आणि अथिया शेट्टी
(Athiya Shetty) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे सेलिब्रेटी कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हे दोघे जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.या दोघांच्या लग्नाच्या चर्चे दरम्यान या दोघांनी नुकतंच भाड्याने घर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल आता त्यांच्या नात्याला एक नवं नाव देऊ इच्छित आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याने मुंबईत समुद्राजवळ एक आलिशान 4 बीएचके अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. तिथे ते काही काळ एकत्र राहणार आहेत.वांद्रे येथील कार्टर रोडवर दोघांचं नवं आलिशान घर आहे. या जोडप्याच्या नव्या घराचे एका महिन्याचे भाडे तब्बल 10 लाख रुपये इतके आहे. याआधी बातम्या आल्या होत्या की, हे जोडपे या वर्षी लग्नही करू शकतात. तथापि, अथियाच्या जवळच्या मित्राने बॉम्बे टाईम्सला सांगितले की, सध्यातरी लग्नाची कोणतीही योजना नाही कारण दोघेही प्रोफेशनल कमिटमेंटमुळे बिझी आहेत.
बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुमारे वर्षभरापूर्वीच त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. केएल राहुल गेल्या वर्षी शेट्टी कुटुंबासोबत अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट 'तडप'च्या स्क्रीनिंगला पोहोचला होता.यावेळी त्याने संपूर्ण शेट्टी कुटुंबासोबत कॅमेऱ्याला पोज दिल्या होत्या.

नुकतंच इन्स्टन्ट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या लग्नाची माहिती शेअर केली होती. त्यांनी यामध्ये आथिया आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांचा वेडिंग प्लॅनसुद्धा तयार असल्याचं म्हटलंहोतं . हे दोघे साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या बातमीनंतर त्यांचे चाहते फारच उत्साहात आहेत. परंतु या दोघांनीही आपल्या लग्नाबाबत अजून कोणतीही अधीकृत माहिती दिलेली नाहीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.