Home /News /entertainment /

Atarangi Re: अक्षय कुमार आता झाला जादूगार; सिनेमाची रीलिज डेट ठरली

Atarangi Re: अक्षय कुमार आता झाला जादूगार; सिनेमाची रीलिज डेट ठरली

Bollywood अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने नुकतंच 'अतरंगी रे' चित्रपटाचं शूटींग पूर्ण केले आहे. फोटो शेअर करताना त्याने त्याखाली भावुक पोस्टही लिहिली आहे.

  मुंबई, 27 मार्च: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar new film) याच्या 'अतरंगी रे' (Atarangi Re release date) या चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे. याबाबतची माहिती स्वत: अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्याचबरोबर जादूगाराच्या वेशात बदामच्या बादशाह चाहत्यांना दाखवला आहे. काळी टोपी आणि लाल रंगाच्या गोल्डन डिझाईन असलेला सूट अक्षयने परिधान केला आहे. चेहऱ्यावरचा हसरा भाव पाहता या चित्रपटात अक्षयची अतरंगी म्हणता येणार पण हटके भूमिका असेल यात शंका नाही. फोटो शेअर करताना त्याने त्याखाली भावुक पोस्टही लिहिली आहे. 'आज अतरंगी रे या चित्रपटाच्या शूटींगचा शेवटचा दिवस होता.  आनंद एल राय यांनी क्रिएट केलेल्या जादूचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल इतका वेळ मी दवडू शकत नाही. माझ्यासोबत काम केलेल्या सारा अली खान आणि धनुषचा मी आभारी आहे. त्यांनी मला चांगल्या चित्रपटाचं भाग बनवलं'
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  'अतरंगी रे' चित्रपटाचं कथानक हिमांशू शर्मा यांनी लिहिलं आहे. तर इरशाद कामिल यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. चित्रपटातील तगड्या स्टारकास्टमुळे दिग्दर्शक आनंद एल राय यांचा 'अतरंगी रे' हा चित्रपट शूटींगच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. सारा अली खान आणि धनुषसोबत अक्षय कुमार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सारा अली खान आणि धनुषही लीड रोलमध्ये आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  हा चित्रपट येत्या 6 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर चालणार का हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
  Published by:News18 Digital
  First published:

  Tags: Akshay Kumar, Sara ali khan

  पुढील बातम्या