मुंबई, 18 सप्टेंबर : सर्वांचा लाडका 'आपला सिद्धू' म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सिद्धार्थ नेहमीच सज्ज असलेला पहायला मिळतो. सिद्धार्थ सध्या स्टार प्रवाहवर 'आता होऊ दे धिंगाणा' या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसत आहे. या शोमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील कलाकार दर आठवड्याला हजेरी लावतात. यावेळी सिद्धार्थ त्यांच्यासोबत धमाल, मस्ती, खेळ खेळताना दिसतो. नुकताच शोमधील सिद्धार्थचा एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये सिद्धार्थची भन्नाट इंग्रजी पहायला मिळाली.
या आठवड्यात ठिपक्यांची रांगोळी आणि सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकार 'आता होऊ दे धिंगाणा' कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. याचे जबरदस्त प्रोमोही पहायला मिळाले. नुकताच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सुद्धार्थ आणि सहकुटुंब सहपरिवारमधील पश्याच्या इंग्रजी झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव आणि पश्या मस्त इंग्रजीमध्ये संभाषण करत आहेत. मात्र त्यांची भन्नाट इंग्रजी ऐकूण तुम्हीही हसून लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाही.
View this post on Instagram
सिद्धार्थ जाधवने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 'आपला सिद्धू + पश्या आणि आमची भाषा, आपलं इंग्रजी.. भन्नाट इंग्रजी', असं कॅप्शनही सिद्धार्थनं व्हिडीओसोबत शेअर केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत असून सगळ्यांना खळखळून हसायला लावत आहे.
हेही वाचा - 'बस प्यार ही प्यार...'; प्रियाच्या बर्थडेला उमेश झाला रोमँटिक, 'तो' व्हिडीओ शेअर म्हणाला...
दरम्यान, 'आता होऊ दे धिंगाणा' या शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दोन मालिकांमधील जुगलबंदी पहायला प्रेक्षकांना आवडत आहे. याशिवाय सिद्धार्थ जाधवचं सूत्रसंचालन तर शोची शोभा आणखीनच वाढवण्याचं काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.