#Metoo मोहिम पुरुष विरुद्ध स्त्री असा संघर्ष नाही-तनुश्री दत्ता

#Metoo मोहिम पुरुष विरुद्ध स्त्री असा संघर्ष नाही-तनुश्री दत्ता

#Metoo हे पुरुष विरुद्ध स्त्री असा संघर्ष नाही. अनेक संवेदनशील पुरुष शोषित महिलांच्या पाठीशी उभे राहत आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : २००८ मध्ये जेव्हा मी आरोप केले, तेव्हा मला जाहीररित्या कुणीही पाठिंबा दिला नाही, अशी खंत अभिनेत्री तनुश्री दत्तानं व्यक्त केली. शुक्रवारी लोकमत वृत्तसमुहातर्फे आयोजित वूमन समीतमध्ये me too, we too या विषयावर आयोजित चर्चा सत्रात ती बोलत होती.

तेव्हा मला अनेकांनी चित्रपट ऑफर दिली, पण माझ्या बाजूनं समोर येऊन कुणीही बोललं नाही. अनेक महिलाही पुरुषांवर आरोप करण्याचा विरोध करतात, कारण त्यांना पुरुषी अत्याचारांची सवय झालेली असते, असंही ती पुढे म्हणाली.

#Metoo हे पुरुष विरुद्ध स्त्री असा संघर्ष नाही. अनेक संवेदनशील पुरुष शोषित महिलांच्या पाठीशी उभे राहत आहेत. या निमित्ताने अनेक महिला बोलू लागल्या आहेत. ही सकारात्मक गोष्ट आहे असं मतही तनुश्री दत्ताने व्यक्त केलंय.

2008 साली मला 30, 40 सिनेमे ऑफर झालेत. पण मी केलेल्या आरोपांना बळकटी देण्यासाठी सिनेसृष्टीतीलं कुणीही माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही. असं सांगताना आज जे माझ्या बाबतीत घडलं ते इतर कोणत्याही अभिनेत्रीसोबत घडू शकतं, असंही तनुश्री म्हणाली.

आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीनं बोलू नये, सहन करावं अशीच मानसिकता असल्याने महिला बोलत नाहीत आणि अत्याचार जेवढा गंभीर तितकी शांतता अधिक असं निरीक्षणही तनुश्रीनं यावेळी नोंदवलं.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 07:42 AM IST

ताज्या बातम्या